'एका मुलीसोबत बोअर होतो, म्हणून तर मला...' सलमाननं कुणाला सांगितली होती मन की बात?

मुंबई: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा त्याच्या वेगळेपणासाठी नेहमीच चर्चेत असतो. त्याचा अंदाज हा इतर अभिनेत्यांपेक्षा वेगळा असल्यानं त्याच्या नावाला मिळणारी पसंती मोठी असते. सध्या सलमान हा त्याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.सलमानसोबत ज्या अभिनेत्रींनी काम केले त्यांनी नेहमीच त्याची स्तुती केली आहे. त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. आता याला काही अभिनेत्री अपवादही आहेत. त्यांनी सलमानचा आक्रस्ताळेपणा, त्याचा आक्रमकपणा, चिडखोर वृत्ती, गर्विष्ठपणा यावर बिनधास्तपणे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात त्याची मैत्रीण सोफी अली, ऐश्वर्या रॉय यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

आता सलमानविषयी त्याची जुनी मैत्रीण मैंने प्यार किया फेम भाग्यश्रीनं जो खुलासा केला आहे तो भलताच धक्कादायक आहे. त्यामुळे सलमान पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आला आहे. काही दिवसांपूर्वी एका पार्टीमध्ये सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांना हात करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो सोशल मीडियावर प्रचंड हिटही झाला होता. यासगळ्यात नेटकऱ्यांनी त्या व्हिडिओवर दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट होता.
भाग्यश्रीनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, सलमाननं मला सांगितलं होतं की, तो काही चांगला व्यक्ती नाही. त्यानं ही गोष्ट माझ्या मनावर कोरुन ठेवली होती. मैंने प्यार कियाच्या प्रमोशन शुटच्या दरम्यान जेव्हा आम्ही फोटो काढत होतो तेव्हा फोटोग्राफर सांगूनही सलमाननं भाग्यश्रीला किस केलं नव्हतं. त्या घटनेनं माझा सलमानकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. तो कितीही स्वताला वाईट म्हणत असला तरी तो खूप चांगला आहे.सलमान आणि भाग्यश्रीचा मैंने प्यार किया हा प्रचंड हिट झाला होता.त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. एका मुलाखतीमध्ये भाग्यश्रीनं त्याच्यासोबत काम करण्याच्या आठवणी शेयर केल्या आहेत. सलमान कुणाच्या पाठीमागे जात नाही तर त्यालाच फॉलो करणाऱ्या अभिनेत्रींची संख्या जास्त आहे. हे काही वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. मला वाटत नाही की मी एका मुलीसोबत जास्त काळ राहू शकेल म्हणून तर मी कुणाला जास्त माझ्याजवळ येऊ देत नाही. असे सलमाननं आपल्याला सांगितले होते. असेही भाग्यश्रीनं यावेळी सांगितले.
भाग्यश्रीला सलमाननं जे काही सांगितले होते ते आजच्या परिस्थितीशी ताडून पाहिल्यास त्यानं भाग्यश्रीला काही खोटे सांगितले नव्हते. असे म्हणता येईल. काही असलं तरी सलमानला कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत राहणे जमले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने