राहुल गांधींची खासदारकी जाणार? लोकसभा सचिवालयाने धाडली नोटीस

नवी दिल्लीः राहुल गांधी यांच्या खासदारकीवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. त्यांच्या एका विधानामुळे लोकसभा सचिवालयाने त्यांना नोटीस जारी केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधाने केलेल्या एका विधानामुळे राहुल गांधी अडचणीमध्ये सापडले आहेत. त्यांना पाठवण्यात आलेल्या नोटिसीचं उत्तर १५ फेब्रुवारीपर्यंत द्यावं लागणार आहे.संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी विशेषाधिकार भंगाची नोटीस राहुल गांधींना पाठवली आहे. 'सभापतींना कोणतीही माहिती दिल्याशिवाय पंतप्रधानांवर आरोप करता येणार नाहीत' असं निशिकांत दुबे म्हणाले. विहीत वेळेमध्ये राहुल गांधींनी आपलं म्हणणं मांडलं नाही तर त्यांना माफी मागावी लागेल नाहीतर त्यांना लोकसभेची जागा गमवावी लागेल, असं दुबे म्हणाले.लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलतांना राहुल गांधी यांनी पंतप्रधानांसंदर्भामध्ये विधान केलं होतं. उद्योगपतींच्या संपत्तीमध्ये वाढ झाली, हे सांगतांना त्यांनी त्यांचा संबंध थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडला होता. गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये मैत्री असल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता.राहुल गांधींच्या विधानानंतर त्यांना १० फेब्रुवारी रोजी लोकसभा सचिवालयाने नोटीस जारी केली आहे. हे विधान दिशाभूल करणारे आणि असंसदीय आहे, असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. नियम ३७३, ३७४ आणि ३७४अ अंतर्गत सभापती एखाद्या सदस्याला नियमांचं उल्लंघन केल्याच्या ठपका ठेवत निलंबित करु शकतात. त्यामुळे राहुल गांधींची खासदारकी धोक्यात आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने