“शिव ठाकरे पहिल्या दिवसापासून…” खासदार नवनीत राणांचे ‘ते’ ट्वीट चर्चेत

मुंबई:  ‘बिग बॉस १६’ शोचा ग्रँड फिनाले काही अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपला आहे. सध्या बिग बॉसच्या घरात ट्रॉफी जिंकण्यासाठी सदस्यांची चढा-ओढ सुरु झाली आहे. बिग बॉसचे यंदाचे पर्व मराठमोळा अभिनेता शिव ठाकरेने गाजवले. ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये उत्तम खेळ खेळत मराठमोळ्या शिव ठाकरेने सगळ्यांची मनं जिंकली. शिव ठाकरे या पर्वाचा विजेता ठरणार असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यातच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शिव ठाकरेला पाठिंबा दिला आहे.अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी नुकतंच ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी शिव ठाकरेला मत देण्याबद्दल भाष्य केले आहे. यावेळी त्या म्हणाल्या, “नमस्कार, कलर्स वाहिनीवरील बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वात आपल्या अमरावतीची शान शिव ठाकरे सहभागी झाला आहे. शिव पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत फार प्रामाणिकपणे त्याचा खेळ खेळत आहे.”“त्यामुळे मी एक लोकप्रतिनिधी आणि अमरावतीची नागरिक असल्याच्या नात्याने मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की, यंदा एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या शिव ठाकरेला आपण पाठिंबा देऊ या. त्याबरोबरच त्याला भरघोस मत देऊन बिग बॉसचा विजेता ठरवू या.” असेही नवनीत राणांनी यात म्हटलं.

नवनीत राणा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण यावर कमेंट करत प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या या व्हिडीओवर अनेकजण शिव ठाकरे बिग बॉसचा विजेता होणार अशा कमेंटही करत आहेत.दरम्यान शिव ठाकरे ‘रोडीज’, ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. तो बिग बॉस मराठीचा दुसऱ्या पर्वाचा विजेता आहे. त्यानंतर आता शिवने ‘बिग बॉस’ हिंदीमध्ये सहभाग घेतला आहे. शिव हा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना पाहायला मिळत आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याचा चाहता वर्ग वाढला आहे. टेलिव्हिजन विश्वात लोकप्रिय असलेला शिव ठाकरे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने