Mansoor Ali Khan Pataudi चा 'तो' खुलासा अन् सुन्न झाल्या होत्या सिमी ग्रेवाल..मिनटात झालं होतं ब्रेकअप..

मुंबई: राज कपूरचा सिनेमा 'मेरा नाम जोकर' आपल्या बोल्ड सीनमुळे भलताच चर्चेत आला होता आणि ज्यामुळे सिमी ग्रेवाल हे नाव देखील प्रसिद्ध झालं.सिमी ग्रेवाल लंडनमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्यात. वयाच्या १५ व्या वर्षी त्या आपल्या कुटुंबासोबत भारतात आल्या. त्यांनी आपल्या सबंध करिअरमध्ये आपल्या काळातल्या जवळपास अनेक बड्या निर्माता-दिग्दर्शकासोबत काम केलं आहे.अर्थात,आपल्या करिअरपेक्षा अधिक त्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या. प्रसिद्ध क्रिकेटपट्टू मन्सूर अली खान पतौडी यांच्यासोबत जोडलेले त्यांचे नाव खूप चर्चेत राहिले.सिमी ग्रेवाल जेव्हा १७ वर्षांच्या होत्या तेव्हा त्या जामनगरच्या महाराजांना डेट करत होत्या. पण काहीच वर्षात त्यांचे काहीतरी बिनसले आणि ते वेगळे झाले. त्यानंतर सिमी यांच्या आयुष्यात सैफ अली खानचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांची एन्ट्री झाली.मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार,दोघं एकमेकांसोबत खूप वेळ घालवायचे. एवढंच नाही तर सिमी विषयी मन्सूर खूप सीरियस होते आणि तिच्याशी त्यांना लग्न करायचं होतं.पण अचनाक पतौडी यांचे शर्मिला टागोर यांच्यावर मन जडले आणि ते एकेदिवशी तडक सिमीच्या घरी पोहोचले.सिमीनं स्वतः दरवाजा उघडला. 

घरात येताच मन्सूर यांनी क्षणाचाही विलंब न करता म्हटलं,''मला माफ कर,पण मी एक गोष्ट इथे स्पष्ट करू इच्छितो की आपल्या दोघांमध्ये जे काही होतं ते आता संपलं आहे. कारण माझ्या आयुष्यात कुणीतरी दुसरं आहे''.पण याआधी सिमी मन्सूर यांना काही बोलणार इतक्यात ते जाण्यास उठले. जेव्हा सिमी ग्रेवाल पतौडी यांना घराच्या बाहेर सोडायला आल्या तेव्हा तिथे शर्मिला टागोर दिसल्या. त्या क्षणानंतर सिमी आणि पतौडी कायमचे वेगळे झाले. त्यानंतर मन्सूर अली खान पतौडी यांनी शर्मिला टागोर यांच्याशी लग्न केलं.ब्रेकअप नंतर सिमी ग्रेवाल यांनी मन्सूर अली खान पतौडी यांच्याविषयी मनात कटूता कधीच बाळगली नाही. लग्नानंतर मन्सूर अली खान पतौडी शर्मिला टागोर सोबत सिमी ग्रेवालचा प्रसिद्ध चॅट शो 'Rendezvous With Simi Garewal' मध्ये देखील आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने