'ना शाहरुख..ना दीपिका..बेशरम रंग गाणं हिट झालं ते 'या' कारणानं', गायिका शिल्पा राव स्पष्टच बोलली

मुंबई: बॉलीवूड सिनेमे अनेकदा प्रमाणापेक्षा गाण्यांचा असलेला भरणा..कधीतरी ओढूनताणून घुसडलेली गाणी यामुळे लोकांच्या टीकेला सामोरे गेले आहेत. बॉलीवूड सिनेमांमध्ये ही त्रुटी नेहमीच पाहिली जाते. आणि त्यामुळेच यावर सुधारणा म्हणून 'पठाण' सिनेमात केवळ दोन गाणी ठेवण्यात आली. त्यातील एक 'बेशरम रंग' आणि दुसरं गाणं 'झूमे जो पठान..', अर्थात पहिलं गाणं 'बेशरम रंग' हे जसं रिलीज झालं तसं यानं सगळीकडे खळबळ उडवून दिली.खरंतर 'बेशरम रंग' गाण्यावरनं इतका वाद पेटेल असा विचार निर्मात्यांच्या मनातही आला नसेल. या गाण्यावर सर्वसामान्य लोक कमालीचे भडकलेले दिसले..अनेकांच्या धार्मिक भावना या गाण्यानं दुखावल्या गेल्या..गाण्यातील दीपिकाच्या भगव्या बिकिनीनं या वादाचा उडालेला भडका पठाणला गिळंकृत करतो की काय असंच भयावह वातावरण निर्माण झालं होतं.दीपिका आणि शाहरुखवर चित्रित झालेलं हे गाणं शिल्पा रावनं गायलं आहे. दीपिका पदूकोणसाठी शिल्पा रावनं पहिल्यांदाच गायलं होतं. आता शिल्पानं गाणं हिट का झालं याचं कारण सर्वांसमोर आणलं आहे.'पठाण' सिनेमातील 'बेशरम रंग' हे गाणं दीपिका आणि शाहरुखवर स्पेनच्या एका बीचवर चित्रित केलं गेलं आहे. हे गाणं सिनेमा रिलीज आधी डिसेंबरमध्ये रिलीज केलं गेलं आणि सगळीकडे वादग्रस्त चर्चा,आंदोलनं सुरु झाली..इतकंच नाही तर सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणीही केली गेली.शेवटी घाबरतच निर्मात्यांनी सिनेमा रिलीज केला पण त्यानंतर मात्र बॉक्सऑफिसवर कमाईची धडाधड बरसात झालेली आपण सगळ्यांनीच पाहिली असेल. सिनेमानं अनेक जुने रेकॉर्ड मोडत नवीन रेकॉर्ड नावावर केले.१२ डिसेंबर २०२२ रोजी 'बेशरम रंग' गाणं रिलीज केलं गेलं होतं. सोशल मीडियावरील एका नेटकऱ्यानं या गाण्यावर प्रतिक्रिया दिली..आणि त्यामुळे पुढे जे घडलं ते फारच मोठं महानाट्य होतं.आपल्या एका मुलाखतीत शिल्पा रावनं म्हटलं की, ''बेशरम रंग गाणं दीपिका पदूकोण आणि शाहरुख खान यांच्यातील केमिस्ट्रीमुळे जबरदस्त हिट ठरलं आहे''.एका इंग्रजी वृत्तपत्राशी बातचीत करताना शिल्पा म्हणाली, ''हे गाणं दीपिकानं स्वतः खूप एन्जॉय केल्याचं दिसत आहे..आणि म्हणूनच ते हिट ठरलं. तिच्यामुळेच गाण्यात जास्त जोश भरला गेला''.

शिल्पा पुढे म्हणाली,''या गाण्यात दिपिका स्वतःला सेलिब्रेट करताना दिसत आहे. शाहरुख आणि दीपिकाची केमिस्ट्री स्क्रीनवर खूपच आनंद देऊन जात आहे. दोघेही कमाल दिसतायत या गाण्यात''.दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद मला म्हणाले होते की हे एक एसं गाणं आहे, ''ज्यात दीपिका स्वतःचीच प्रशंसा करताना दिसणार आहे.. त्यामुळे मला हे गाणं गाताना खूप छान वाटत होतं. कारण एक स्त्री स्वतःला सेलिब्रेट करताना दिसणार होती. त्यामुळे माझा ऊर अभिमानाने भरून आला होता''.या गाण्यावरील लोकांच्या प्रतिक्रियांवर बोलताना शिल्पा म्हणाली,''माझं आतादेखील हेच म्हणणं आहे की हे गाणं जसं आहे तसं सर्वोत्तम आहे. गाण्यात मेलडी आहे,याचे शब्द खूप अर्थपूर्ण आहेत. या गोष्टींमुळेच तर लोक कनेक्ट होतात एखाद्या कलाकृतीशी. जेव्हा हे गाणं स्टेजवर गायलं जाईल तेव्हा आणखी प्रसिद्धी मिळेल गाण्याला''.''मला वाटतं हे गाणं अधिक प्रसिद्ध झालं कारण लोकांना गाण्याचा खरा अर्थ कळला आहे. हे गाणं आपल्याला सांगतं तुम्ही जसे आहात तसं स्वतःला स्विकारा,स्वतःवर प्रेम करा..कुणालाही स्वतःविषयी स्पष्टिकरण द्यायला जाऊ नका. लोकांना हे कळलं आणि म्हणूनच त्यांनी गाण्याला पॉप्युलर केलं''.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने