"फडणवीसांचं महत्व वाढवायचं नाही"; पहाटेच्या शपथविधीवर अखेर पवार बोलले

पुणे : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांना माहिती होतं असा दावा नुकताच फडणवीस यांनी केला होता. यावर सुरुवातीला शरद पवारांनी प्रतिक्रिया देणं टाळलं होतं, पण आज त्यांनी यावर भाष्य केलं असून फडणवीसांचं महत्व वाढवण्याची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, "पहाटेच्या शपथविधीबाबत त्यांनाच विचारायची गरज आहे की, इतक्या दिवसांनी त्यांनी हे प्रकरण का काढलं? त्यांच्या वक्तव्याला उत्तर देऊन मी त्यांचे महत्त्व वाढवणार नाही"सत्ता संघर्षावर केलं भाष्य

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात नुकतीच सुनावणी झाली. यावर भाष्य करताना पवार म्हणाले, मी ऐकलं की मंगळवारी याचा निर्णय येऊ शकतो. बघू आता मंगळवारी काय होतं ते इंटरेस्टिंग आहे. काय होतं हे सांगणं अवघड आहे.

गिरीश बापट यांचा राजकीय प्रचार म्हणजे....

खासदार गिरीश बापट हे आजारी असतानाही भाजपनं त्यांना पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरवल्यानं भाजपवर चौफेर टीका होत आहे. यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. पवार म्हणाले, "त्यांना प्रचारात आणणं ही भाजपची गरज होती का? ठाऊक नाही. पण मी गिरीश बापट यांना भेटून आलो होतो, त्यांची प्रकृती पाहता त्यांच्या यातना वाढू नये हीच अपेक्षा आहे"

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने