मोदींचं संसदेतील भाषण अन् 32 वर्ष जुना Video झाला Viral; "कान खोलकर सुन, हमने मां का दूध..."

दिल्ली:  संसदेच्या अधिवेशनात काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. त्यामध्ये त्यांनी भारत कसा विकासाच्या दिशेने पुढे जात असून कशा प्रकारे विकास केला आहे ते सांगितलं. त्याचबरोबर टीका करणाऱ्या विरोधकांचाही चांगलाच समाचार या ठिकाणी घेतला. त्यानंतर नरेंद्र मोदी यांचा तब्बल ३२ वर्ष जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.दरम्यान, काल संसदेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, "काश्मीरमधील ज्या लाल चौकात पाकिस्तानचा झेंडा फडकावला जायचा त्या लाल चौकात आज तिरंगा फडकतोय" त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या टीका करताना मोदी म्हणले की, मागच्या शतकाच्या शेवटी मीसुद्धा काश्मीरमध्ये यात्रा घेऊन गेलो होतो."ज्यावेळी मी यात्रा घेऊन काश्मिरात गेलो त्यावेळी तिथे दहशतवाद्यांनी पोस्टर लावले होते. असा कोण आहे, ज्याने आईचे दूध प्यायले आहे, कोण लाल चौकात तिरंगा फडकवणार? असे पोस्टर दहशतवाद्यांनी लावले होते.तरीही मी त्या वर्षी सुरक्षेशिवाय आणि बुलेट प्रूफ जॅकेटशिवाय येऊन लाल चौकात तिरंगा फडकवणार असल्याचं सांगितलं होतं आणि फडकावलासुद्धा." असं मोदी म्हणाले.दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या कालच्या भाषणानंतर त्यांचा ३२ वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते लाल चौकात तिरंगा फडकावणार असल्याचं सांगताना दिसत आहे. तर याच भाषणाचा त्यांनी आज संसदेत उल्लेख केला असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने