सूर्याचा मोठा भाग तुटला?, शास्त्रज्ञांनी VIDEO शेअर करत केला धक्कादायक दावा!

दिल्ली: शास्त्रज्ञांनी सूर्याबाबत धक्कादायक दावा केला आहे. सूर्याच्या एका मोठ्या भागाचे तुकडे झाल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने सूर्यास्ताची ही घटना पाहिली आहे.या दाव्यानंतर जगभरातील शास्त्रज्ञांना धक्का बसला आहे. याबाबत अधिक माहिती गोळा करण्यात येत आहे. अवकाश शास्त्रज्ञ आता या घटनेचे विश्लेषण करत आहेत.अंतराळ हवामानशास्त्रज्ञ डॉ. तमिता  स्कोव्ह  यांनी ट्विटरवर त्याचे फुटेज शेअर केले आहे. ते म्हणाले,  एक भाग फिलामेंटपासून ठळकपणे वेगळा झाला आहे आणि उत्तर ध्रुवाभोवती एक विशाल ध्रुवीय भोवरा म्हणून फिरत आहे. सूर्याचा एक मोठा भाग त्याच्या पृष्ठभागापासून तुटला आहे आणि आता वावटळीसारखा त्याच्याभोवती फिरत आहे. यामुळे शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत. ते कसे घडले हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेची नोंद नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने केली आहे. हा व्हिडीओ अंतराळ हवामान अंदाज शास्त्रज्ञ डॉ. तमिता स्कोव्ह यांनी ट्विटरवर शेअर केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने