ब्रेकअप सगळ्याचंच होतं, पण ज्यांनी क्लिन शेव्ह केली आहे त्यांना.... शाहीद कपूर स्पष्टच म्हणाला

मुंबई: आपण प्रेम करतो एका व्यक्तीवर.. खुप छान दिवस असतात ते.. नंतर काही कारणास्तव नातं संपतं.. सुखद स्वप्नांची राखरांगोळी होते.. आणि मग ज्याला आजच्या काळात म्हणतात तो ब्रेकअप शब्द दोघांच्या माथी चिकटतो.खरी कसरत असते ती ब्रेकअप झाल्यानंतर.. मनातलं दुःख फार कोणासमोर सांगू शकत नाही. ज्या व्यक्तीसाठी मन झूरतं ती व्यक्ती आयुष्यातून दूर निघून जाते.अव्यक्त भावनांची घुसमट मनात तशीच दाबून राहते. बॉलिवूड सुपरस्टार शाहिद कपूर सुद्धा याला अपवाद नाही.शाहिद कपूरचा एक जुना व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. कबीर सिंगच्या ट्रेलर लाँचच्या वेळी शाहिद कपूरने दिलेल्या उत्तराने सर्वांनाच इमोशनल व्हायला झालंय.एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर शाहिद म्हणाला होता, "तुम्ही बघितलं असेल मला अशा अवस्थेत. फरक इतकाच होता की मी कबीर सिंग सारखी दाढी वाढवून फिरत नव्हतो. हृदय सर्वांचं तुटतंच" अशा शब्दात शाहिदने त्याच्या ब्रेकअप अवस्थेचं वर्णन केलं होतंसर्वांना माहीतच आहे कि शाहीद अभिनेत्री करीना कपूर सोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघांच्या नात्याची खूप चर्चा होती. दोघे लग्न करणार असं सर्वांना वाटतं होतं. शाहिद - करिना एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पण दोघांची रिलेशनशिप पुढे जाऊ शकली नाही.बॉलिवूड रिपोर्टनुसार करीनाची आई बबिता आणि बहीण करिष्मा कपूर या दोघांच्या लग्नाच्या विरोधात होती. शेवटपर्यंत त्यांनी त्यांचा विरोध कायम ठेवला. त्यामुळे घरच्यांविरोधात करीनाला कोणतेही पाऊल उचलता आलं नाही. आणि दोघांचं नातं संपुष्टात आलं.पुढे शाहिदने त्याच्यापेक्षा १४ वर्ष लहान असलेल्या मीरा राजपूत सोबत लग्न केलं. या दोघांना मिशा हि मुलगी आहे. तर करीना कपूरने सुद्धा २०१२ ला सैफ अली खान सोबत लग्न केलं. तिला तैमूर आणि जहांगीर हि दोन मुलं आहेत.शाहिदची फर्जी हि वेबसिरीज अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाली असून करीना कपूर हंसल मेहता यांच्या आगामी प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहे. शाहिद आणि करीनाचा जब वी मेट यंदा व्हॅलेंटाईन डे निमित्ताने पुन्हा रिलीज झाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने