मुंबई: ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यंदाचं ‘बिग बॉस हिंदी’चं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. ‘बिग बॉस’च्या घरातील शालिन भानोत व टीना दत्ता त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आले होते. शालिन व टीनामध्ये ‘बिग बॉस’च्या घरात जवळीक वाढली होती. पण नंतर मात्र त्यांच्यात खटके उडालेले पाहायला मिळाले. टीनाबरोबरच्या रिलेशनशिपवर शालिनने ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच भाष्य केलं आहे.
शालिनने ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. शालिन म्हणाला, “बिग बॉसच्या घरात टीना आणि मी एकमेकांना समजण्याचा प्रयत्न करत होतो. ‘बिग बॉस’च्या घरातील आमचं नात खरं होतं. आमच्यात जे काही झालं ते नैसर्गिक आणि सहपणाने झालेलं होतं. टीनाबरोबरच्या नात्याला मला कोणताही टॅग द्यायचा नाही. ‘बिग बॉस’च्या घरात असताना तिने माझी खूप काळजी घेतली आहे”. “बिग बॉसच्या घरात ज्या सदस्यांबरोबर मी मैत्री केली, त्या प्रत्येक नात्यामुळे मलाच बदनाम केलं गेलं. त्यामुळे मी नंतर कोणाशीही मैत्री न करण्याचा निर्णय घेतला”, असंही शालिन पुढे म्हणाला.
‘बिग बॉस’च्या घरात टीनाबरोबर रिलेशनशिपमध्ये आल्याने शोमध्ये टिकून राहण्यास फायदा होईल, असं वाटलेलं का?, असंही शालिनला विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना तो म्हणाला, “बिग बॉसमध्ये राहण्यासाठी टीनाबरोबर मी रिलेशनशिपमध्ये आलो नव्हतो. तसं असतं, तर मी शोमधून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली नसती. बिग बॉसचं घर हा शो खूप छान आहे. पण घरातील सदस्यांमुळे घरात तसं वातावरण निर्माण होतं”.घरातील टीनाबरोबरच सुम्बुलबरोबरचं त्याचं रिलेशनशिपही चर्चेत आलं होतं. शालिन ‘बिग बॉस’च्या सोळाव्या पर्वातील टॉप ५ सदस्यांपैकी एक होता. परंतु, त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.