दुखऱ्या पायावरही जोकोविचची मात!

मेलबर्न : सर्बियाचा महान टेनिसपटू नोवाक जोकोविच याने दुखापतीवर मात करीत ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅमच्या विक्रमी जेतेपदावर मोहोर उमटवली. दुखऱ्या पायासह जोकोविच लढला आणि स्टेफानोस सितत्सिपासवर विजय मिळवला.हे त्याचे दहावे ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद ठरले. तसेच २२ व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदालाही त्याने गवसणी घातली. जोकोविचच्या दुखापतीची माहिती ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे संचालक क्रेग टिले यांनी बुधवारी दिली.कोराना नियम व लशीची पूर्णता न केल्यामुळे जोकोविच मागील ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेला मुकला. यंदा मात्र त्याला या स्पर्धेमध्ये सहभागी होता आले. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेआधी ॲडलेड येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.ऑस्ट्रेलियन ओपनआधीची सराव स्पर्धा म्हणून याकडे बघितले गेले. या स्पर्धेमध्येच त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतरही जोकोविचने ॲडलेड येथील स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवली.

जोकोविच प्रत्येक क्षणावर लक्ष केंद्रित करतो. सराव, जेवण, पेय काहीही असो; त्याचे प्रत्येक मिनिटावर बारकाईने लक्ष असते. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा त्याने दहाव्यांदा जिंकली आहे. या कालावधीत त्याला खूप काही सोसावे लागले, पण त्याने सर्व बाबींवर मात केली. यामधून तो लीलया बाहेर आला. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याने इतिहास रचला. याची पुनरावृत्ती होईल असे वाटत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने