भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याची ताकद कोणाच्या बापात नाही; मौलाना रझांचं थेट आव्हान

बरेली: हरियाणातील भिवानी घटनेवर बोलताना मौलाना तौकीर रझा यांनी प्रक्षोभक वक्तव्य केलंय. आरएसएस आणि बजरंग दल  या दहशतवादी संघटनाआहेत, असं ते म्हणाले.मौलाना रझा म्हणाले, 'देशात कायद्याचा धाक उरला नाही. राज्यात अत्याचाराच्या घटनेत वाढ झालीये. येत्या 15 दिवसांत देशभरातील मुस्लिम दिल्लीतील संसदेला घेराव घालतील. यादरम्यान आरएसएस आणि बजरंग दलावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येणार आहे.'हरियाणातील भिवानी आणि बिहारमधील गया येथील घटनांचा संदर्भ देत ते म्हणाले, देशात कायद्याची थट्टा केली जात आहे. नराधमांना पाठीशी घालणाऱ्यांना राजाश्रय दिला जात आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही भाष्य केलं. आरोपींवर कारवाई न झाल्यास देशभरातील मुस्लिम संसदेवर मोर्चा काढतील. यासाठी त्यांनी सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.आरोपींवर आणि त्यांच्या समर्थनार्थ जमलेल्यांवर कारवाई झाली नाही, तर मुस्लिमही सीमेपलीकडून लढण्यास तयार आहेत. आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या दहशतवादी संघटना असून त्यांना सरकारी आश्रय दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी निवेदनात केलाय.मौलाना रझा यांनी बागेश्वर धाम सरकारवरही टीका केलीये. काही लोक हिंदू राष्ट्राचं स्वप्न पाहत आहेत. पण, भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याची ताकद कोणाच्या बापात नाही. भारत हे आधीच हिंदू राष्ट्र आहे, आता त्यांना भगवा भारत बनवायचा आहे का? असा सवाल त्यांनी केला. मुस्लिमांविरुद्ध एवढा द्वेष आहे, तर समोरासमोर येऊन लढा, असं आव्हानही त्यांनी दिलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने