आम्हाला गुवाहाटीची अन् रेड्यांची गरज नाही, कारण आमच्याकडे आहे 'हे' देवस्थान; राऊत जोरात

नाशिकः ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. तेथील कार्यक्रमामध्ये बोलतांना त्यांनी अमित शाह यांच्यासह भाजपवर टीकास्र सोडलं. देवस्थानच्या कार्यक्रमाला संजय राऊत यांची उपस्थिती होती.नाशिकमधील बुवाजी बाबा देवस्थानच्या स्वागत कमानीचं उद्घाटन ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलतांना संजय राऊत म्हणाले की, बुवाजी बाबा देवस्थान ही महाराष्ट्रातील पवित्र जागा आहे. त्यामुळे आम्हांला गुवाहटीला जाण्याची गरज नाही. आम्हाला गुवाहटी आणि रेड्यांची गरज नाही. आमच्याकडे बुवाजी बाबा देवस्थान आहे, असं राऊत म्हणाले.संजय राऊत पुढे म्हणाले की, सध्या आमच्यापुढे बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्याचं आव्हान आहे. त्यासाठी आम्ही लढा देत आहोत. बुवाजी बाबा देवस्थानचे आम्हाला आशीर्वाद आहेत. हे जागरुक देवस्थान असल्याचं संजय राऊत म्हणाले.संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमधील बुवाजी बाबा देवस्थानच्या स्वागत कमानीचं उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते संपन्न झालं. त्यावेळी ते बोलत होते.दुसरीकडे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी सुरु असून दुपारनंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुनावणी होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने