कोविड-19 काळात ज्याचे महाराणीने मानले आभार, तो भारतीय तरुण झाला निर्वासित

लंडन : दक्षिण-पूर्व लंडनमधील रहिवासी गटाने आपल्या सर्वात प्रिय सदस्यांपैकी एक, विमल पंड्या याच्यासाठी लढण्याचा संकल्प केला आहे. पंड्या यांनी कोविड महामारीदरम्यान सेवा दिली होती. ब्रिटनच्या दिवंगत महाराणी एलिझाबेथ-II वतीने त्यांच्या प्रतिनिधीने त्यांचे कौतुक केले होते. मात्र त्यांच्यावरच आता निर्वासिताचं आय़ुष्य जगण्याची वेळ आली आहे. विमल पंड्या याला व्हिसावरील कायदेशीर लढाईत पराभव पत्करावा लागला. आता त्याला हद्दपारीचा सामना करावा लागत आहे.



रॉदरहिथ रेसिडेंट्स ग्रुपने विमल पंड्या यांच्या समर्थनार्थ ऑनलाइन पद्धतीने १,७७,००० स्वाक्षऱ्या गोळा केल्या आहेत. पंड्या भारतातून विद्यार्थी व्हिसावर यूकेला गेला होता, परंतु त्याच्या शैक्षणिक संस्थेने परदेशी विद्यार्थ्यांना प्रायोजित करण्याचा परवाना गमावल्याने त्याचा व्हिसा थांबवण्यात आला होता.४२ वर्षीय पंड्या अलीकडेच इमिग्रेशन ट्रिब्युनलमध्ये खटला हरला. आता या खटल्यात आणखी लढा देण्यासाठी त्याच्या वकिलांशी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.रॉदरहिथ निवासी गटाने गेल्या आठवड्यात Change.Org याचिका अपलोड केली होती. त्यात म्हटले होते की, "आम्ही उद्ध्वस्त झालो, पंड्या देखील उद्ध्वस्त झाला, पण पुढे मार्ग सापडला तर आम्ही लढाई थांबवणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने