'टायगर 3 भारी पडणार 'पठाण'वर', भाईजान बॉक्स ऑफिसवर करणार धमाका

मुंबई: शाहरुख खानचा चित्रपट पठाण बॉक्स ऑफिसवर यशाचे सर्व विक्रम मोडत आहे. किंग खानचे 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन झाल्याचे चाहते सेलिब्रेशन करत आहेत. जगभरात कमाईचा विचार केला तर पठाण जवळपास 850 कोटींवर पोहोचला आहे. शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटात सलमान खानने उत्कृष्ट कॅमिओ केला आहे.पठाणला वाचवण्यासाठी टाइगर येतो आणि मग त्याच्या पुढच्या मिशनसाठी निघून जातो. पठाणमधील टायगर 3 चा टीझर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याचवेळी टायगर 3 चे लेखक श्रीधर राघवन म्हणतात की सलमानचा 'टायगर 3' हा चित्रपट 'पठाण' पेक्षा बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल.यशराज फिल्म्सच्या स्पाय वर्ल्डचा पुढचा चित्रपट 'टायगर 3' बद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. आता पठाणचे स्क्रीनप्ले लेखक श्रीधर राघवन यांनी 'टायगर 3' बाबत मोठा खुलासा केला आहे. मीडियाशी बोलताना श्रीधर राघवन म्हणाले की, 'मला वाटते की टायगर 3 बॉक्स ऑफिसवर धमाका करेल आणि ते पाहून तुम्ही 'वाह' म्हणाल'.'मी चित्रपटाच्या लेखनाशी निगडीत आहे, त्यामुळे मी जास्त बोलणे टाळत आहे. मला वाटते की हे खूप मजेदार आहे, आम्ही टायगर 1 आणि टायगर 2 या चित्रपटातील भूमिका पुढे नेल्या आहेत, परंतु मी याबद्दल जास्त बोलणार नाही. आता काही महिने बाकी आहेत, पण टायगर 3 धमाका करेल हे मी नक्की सांगू शकतो. हा चित्रपट तुम्ही किमान 3-4 वेळा बघाल'.दरम्यान, शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट जगभर चांगली कमाई करत आहे. किंग खानच्या चित्रपटाने जवळपास 850 कोटींचा आकडा गाठला असून जगभरात खळबळ उडाली आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाणमध्ये शाहरुख खान एका रॉ एजंटच्या भूमिकेत दिसत आहे. दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनीही या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने