चीनला मोठा झटका! भारतानंतर आता कॅनडाने घेतला TikTok बाबत मोठा निर्णय

कॅनडा: भारतानंतर आता कॅनडानेही चिनी अॅप टिकटॉकवर बंदी घातली आहे. कॅनडाने सोमवारी याची घोषणा केली आहे.कॅनडाने सरकारने जारी केलेल्या डिव्हाइसेसवर ही बंदी घालण्यात आली आहे. या अॅपमुळे गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी जोखीम असल्याचे कॅनडियन सरकारने म्हटले आहे.कॅनडा सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार टिकटॉकवरील ही बंदी आजपासून म्हणजेच 28 फेब्रुवारीपासून लागू केली जाणार आहे.या निर्णयामुळे सरकारद्वारे जारी केलेल्या मोबाइल डिव्हाइसवरून टिकटॉक काढून टाकले जाणार असून, सायबर सुरक्षा लक्षात घेऊन कॅनडा सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. व्हाईट हाऊसकडून 30 दिवसांचा अवधी

दुसरीकडे व्हाईट हाऊसकडून जारी केलेल्या सर्व सरकारी डिव्हाईसेसमधून चीनी अॅप टिकटॉक काढून टाकण्यासाठी फेडरल एजन्सीला 30 दिवसांचा अवधी दिला आहे. चिनी यावरील व्हिडिओच्या माध्यमातून डेटा चोरी करू शकतो अशी भीती अमेरिकेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने