'राजा माणुस हा दिलदार', शिवचं बिग बॉसकडून तोंड भरुन कौतुक

मुंबई:  आज बिग बॉस 16 चा शेवटचा शुक्रवारचा एपिसोड आहे आणि हा दिवस खूप खास असणार आहे. कारण घरच्यांना आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. शेवटच्या एपिसोडमध्ये शालीन भानोत आणि प्रियंका चहर चौधरी यांचा प्रवास दाखवण्यात आला होता आता आज उरलेल्या स्पर्धकांचा प्रवास दाखवला जात आहे. ज्यात बिग बॉसने शिव ठाकरेचा प्रवास दाखवला जो सर्वांनाच खुप आवडणारा होता.बिग बॉस 16 च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये बिग बॉसने पहिल्यांदा शिव ठाकरे यांचा प्रवास दाखवला. घरातील बलाढ्य खेळाडूंमध्ये शिव ठाकरेंचे नाव घेतले जाते. खुद्द सलमान खानच नव्हे तर बिग बॉसने देखील शिवाच्या खेळाचं कौतुक केलं आहे. शिवचं कौतक करताना बिग बॉसने त्याला साष्टांग नमस्कारच केला.बिग बॉसने शिवाला सांगितलं की, शिव हा बिग बॉसच्या इतिहासातील एकमेव खेळाडू आहे ज्याला एक नव्हे तर दोन बिग बॉस फिनालेचा ताज मिळवला आहे. तो या सिझनचा टाक्स किंगही म्हंटलं. एवढंच नाही तर, शिव हा मंडलीचा जीव आहे याठिकाणी बरीच सदस्य होती पण त्यांना चालवणारा शिव ठाकरे होता.मराठा ऐकल्यावर त्यांची वीरता आठवते. वीर मराठ्यांप्रमाणे शिव कोणालाही घाबरला. तो बरोबर एका चौकटीत खेळला. हे सगळं ऐकुन तो भावूक होतो. साजिद खानने घर सोडण्यापूर्वी या मंडलीची काळजी घेण्यास सांगितले होते यावरून हे सिद्ध होते.

त्यांनतर बिग बॉस मराठीत म्हणतो, 'आई शपथ ', हे ऐकताच शिव आणि त्याचे असलेले चाहते आनंदाने नाचू लागले. बिग बॉसकडून कौतुक ऐकून शिव म्हणतो 'बिग बॉस तू माझा गॉडफादर आहेस'बिग बॉस 16 मधील शिव ठाकरेंचा अप्रतिम प्रवास पाहून घरात उपस्थित प्रेक्षकही नाचू लागतात. घरातील त्याचा अप्रतिम प्रवास पाहिल्यानंतर शिव म्हणतो, 'बिग बॉस तुम्ही तर चित्रपटच बनवला आणि मला त्यातला हिरो.' हा शो तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे शिव तुम्ही दाखवून दिलं आहेस. यानंतर बिग बॉस म्हणाले की, आज मी सुद्धा तुझ्यापुढे नतमस्तक होतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने