'पठाण'ला टक्कर देण्यासाठी आला 'शहजादा', बुर्ज खलिफावर दाखवला चित्रपटाचा ट्रेलर

मुंबई:  कार्तिक आर्यन त्याच्या शहजादा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडत नाही. या अभिनेत्याने दिल्लीतील इंडिया गेटपासून दुबईतील बुर्ज खलिफापर्यंत चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. अलीकडेच कार्तिकने दिल्लीच्या इंडिया गेटवर चित्रपटाचे प्रमोशन केले. त्यानंतर चित्रपटाचा ट्रेलर जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला आहे.शाहरुख खान स्टारर 'पठाण' या चित्रपटाचा ट्रेलरही चित्रपटाच्या रिलीजपूर्वी बुर्ज खलिफा येथे दाखवण्यात आला होता.कार्तिक आर्यन बुधवारी दुबईत उपस्थित होता. कार्तिक चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बुर्ज खलिफा येथे पोहोचला होता. कार्तिकसह त्याचे अनेक चाहते या खास क्षणाचे साक्षीदार झाले.कार्तिक आर्यन गेल्या अनेक दिवसांपासून शहजादा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कलाकार त्याच्या चित्रपटाच्या यशासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. कार्तिक ताजमहाल ते इंडिया गेट आणि सामान्य लोकांमध्ये जाऊन या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. बुधवारी कार्तिक चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दुबईला पोहोचला. जिथे जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा वर चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला होता.या खास क्षणी कार्तिक तिथे उपस्थित होता. यावेळी कार्तिकने काळ्या जीन्स आणि टी-शर्टसह हिरव्या रंगाचा कोट घातला होता. जे त्याच्या लूकमध्ये आकर्षण वाढवत होते. प्रमोशन दरम्यान कार्तिकने त्याच्या चाहत्यांची भेट घेतली आणि सेल्फी काढले.

कार्तिक आर्यन या चित्रपटात मुख्य अभिनेता तर आहेच, पण या चित्रपटातून तो निर्माता म्हणूनही पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्याने जीवाचे रान केले आहे.कार्तिक आर्यन स्टारर हा मोस्ट अवेटेड चित्रपट 17 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर कार्तिक आणि क्रिती सेनॉन व्यतिरिक्त या चित्रपटात मनीषा कोईराला, परेश रावल, रोनित रॉय आणि सचिन खेडेकर दिसणार आहेत. रोहित धवन दिग्दर्शित या चित्रपटाला प्रीतमने संगीत दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने