श्रद्धांजलीवरून रशिया-युक्रेन आमनेसामने

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) सुरक्षा परिषदेत रशिया आणि युक्रेन आमनेसामने आले. युद्धाच्या वर्षपूर्तीनिमित्त मृतांना श्रद्धांजली वाहण्यावरून शब्दयुद्धही झडले. वक्त्यांच्या यादीत युक्रेनच्या प्रतिनिधीचा क्रम आधी होता. यावरून रशियाने जाब विचारला. तेथेच वादाची ठिणगी पडली. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमीत्रो क्युलेबा यांना प्रारंभी संधी मिळाली.ते म्हणाले की, या रशियामुळे बळी पडलेल्यांविषयी आपण आज या दुर्दैवी दिनी अखेर शोक व्यक्त करतो आहोत. एक मिनीट स्तब्धता पाळून सर्वांनी श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती मी करतो.

त्यानंतर क्युलेबा आणि त्यांच्यासह सर्व उपस्थितांनी उभे राहून स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर क्युलेबा बसतात तोच रशियाचे संयुक्त राष्ट्रांवरील राजदूत वॅसिली नेबेन्झीया उभे राहिले. युक्रेनमध्ये २०१४ पासून जे काही घडले आणि त्यात मृत्यमुखी पडले अशा सर्वांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण उभे राहात आहोत आणि स्तब्धता पाळत आहोत.यातील २०१४ तसेच सर्वांनी असे दोन शब्द संघर्षास युक्रेन जबाबदार असल्याच्या रशियाच्या दाव्याची पुष्टी करणारे होते. त्यावर्षी रशियाशी मित्रत्वाच्या संबंधांचा पुरस्कार करणारे युक्रेनचे तत्कालीन अध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांना सामुहिक निदर्शनांमुळे पायउतार व्हावे लागले.यास प्रत्यूत्तर देताना रशियाने क्रिमीया द्विपकल्पावर ताबा मिळविला. त्यानंतर रशियन भाषकांचे प्राबल्य असलेल्या दोन्बास विभागात घुसखोरीला चिथावणी देण्यात आली. रशियाने युक्रेनच्या पूर्वेकडील त्या विभागावर अवैधरीत्या ताबा मिळविला आहे.रशियाच्या आवाहनाला थंडा प्रतिसाद

युक्रेनमधील २०१४ पासूनच्या घडामोडींचा संदर्भ रशियाचे प्रतिनिधी नेबेन्झिया यांच्या वक्तव्याला होता. ते म्हणाले की, सर्वांचे जीव अनमोल आहे आणि म्हणूनच आपण सर्वांच्याच स्मृतीप्रित्यर्थ उभे राहात आहोत. त्यानंतर नेबेन्झिया आणि रशियन राजनैतिक अधिकारी उभे राहिले.त्यानंतर सभागृहातील इतर सदस्य काही मिनिटांनी थोडा विचार करून हळू-हळू एक-एक करून उभे राहिले. प्रत्येक जण उभा राहिल्यानंतर सुमारे एक मिनीट स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने