'बापामुळे इतकी प्रसिद्धी नाहीतर', आर्यन खानचा अ‍ॅटिट्यूड पाहून नेटकऱ्यांनी काढली इज्जतच..

मुंबई:  शाहरुख खान हा सध्या त्याच्या पठाण चित्रपटामुळं चर्चेत आहे. मात्र शाहरुख खानचा लाडका मुलगा आर्यन खान हा काही काम न करताही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो.कधी तो बॉलिवूडच्या पार्ट्यांना हजेरी लावतो.कधी एअरपोर्टवर स्पॉट होतो. आर्यन खान नुकताच अनुराग कश्यपच्या 'अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावण्यासाठी पोहोचला होता. पण त्याचा अ‍ॅटिट्यूड पाहून युजर्सने चांगलंच ट्रोल केले आहे.या व्हिडिओमध्ये आर्यन निळा-टी-शर्ट आणि जीन्स घातलेला स्क्रिनिंगमध्ये जाताना दिसला. त्याला फोटोग्राफर्सनी बोलवले तेव्हा तो सरळ आत गेला आणि स्क्रिनिंगमधून बाहेर आल्यावरही फोटोग्राफर्सनी त्याचे नाव पुकारले आणि त्याला फोटोसाठी थांबण्यास सांगितले पण त्याने त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले आणि कारमध्ये बसला. त्याच हे वागणं पाहून युजर्स संतापले.युजरने लिहिले की, “फक्त किंग खान शाहरुख मुळेच त्याला इतकी प्रसिद्धी आणि सन्मान मिळत आहे नाही तर कोणी विचारल नसत .” "तो खूप घमंडी वृत्तीचा आहे ... आणि मीडिया... तुम्हाला नेहमी त्याला का पकडायचे आहे हे माहित नाही. कृपया अशा असभ्य लोकांकडे दुर्लक्ष करा, “त्याचा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा तो थांबेल आणि पापाराझींसाठी पोज देईल.”आर्यनची ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तो अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे नेटिझन्सच्या रडारवर येतो.सगळ्यांना ठाऊक आहेच की, आर्यनला ॲक्टिंगमध्ये काहीही रस नाही. त्याला पडद्यामागे राहून काम करायचे आहे. नुकतीच त्याने एका सिनेमाची घोषणा केली होती. आर्यन दीर्घकाळापासून एका सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करत होता. आता ते काम पूर्ण झाले आहे.  दरम्यान, शाहरुख आणि गौरी खानचा मोठा मुलगा आर्यन त्याच्या पालकांच्या प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंट अंतर्गत लेखक म्हणून पदार्पण करत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने