कँसरमुळे पत्नीला गमावले अन् आता दोन मुलींना घेतले दत्तक, वाचा त्यांच्या कुटूंबात कोण कोण आहे?

दिल्लीभारताचे 50वे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड नेहमी त्यांनी घेतलेल्या न्यायलयीन निर्णयांमुळे चर्चेत असतात. सध्या ते महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीमुळे चर्चेत आहे.नेहमी न्यायलयीन गोष्टींमुळे चर्चेत असणारे चंद्रचुड यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी तुम्हाला माहिती आहे का? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.पहिल्या पत्नीचं निधन

जस्टिस डी वाई चंद्रचूड यांची पहिली पत्नी रश्मीचा २००७ मध्ये कॅंसरनी मृत्यू झाला त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी कल्पना दास यांच्यासोबत लग्न केले. त्या सुद्धा पेशाने वकिल आहे. चंद्रचूड यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचं नाव अभिनव तर लहान मुलाचं नाव चिंतन आहे. ही दोन्ही मुले सुद्धा पेशाने वकिल आहे.

दोन मुलींना घेतले दत्तक

चंद्रचूड यांना दोन मुली सुद्धा आहे. या मुली त्यांनी आणि त्यांची दुसरी पत्नी कल्पना दास यांनी दत्तक घेतल्या. त्यांच्या दोन मुलींची नावे माही आणि प्रियंका असून दोन्ही स्पेशल चाइल्ड आहे..

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने