फिल्मी बॅकग्राऊंड नाही तरीही करण जोहरने सिद्धार्थला कसा दिला ब्रेक ? जाणून घ्या

मुंबई: सिद्धार्थ मल्होत्रा ​​हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​7 फेब्रुवारी म्हणजेच उद्या कियारा अडवाणीसोबत जैसलमेरमध्ये लग्न करणार आहे. दोघांचे लग्नाआधीचे फंक्शन्स सुरू झाले आहेत. अशात सर्वांच्या नजरा शेरशाह जोडीच्या लग्नाच्या अपडेट्सवर खिळल्या आहेत. सिद्धार्थ मल्होत्राने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी खूप संघर्ष केला आहे.सिद्धार्थने प्राथमिक शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण झाल्यांनतर मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला. आपला वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी सिद्धार्थने हा व्यवसाय निवडला होता. सिद्धार्थने या क्षेत्रात खूप नाव कमावले. यानंतर त्याने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला.सिद्धार्थने स्वतः एकदा त्याच्या करिअरबद्दल खुलासा केला होता. त्याने सांगितले की, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरू करण्यापूर्वी त्याने अ‍ॅडमध्येही नशीब आजमावले होते. फार कमी लोकांना माहित असेल की सिद्धार्थ 2008 सालीच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होता.या चित्रपटाचे नाव होते 'फॅशन'. मात्र, मॉडेलिंग मॅगझिनसोबतच्या करारामुळे गोष्टी प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत आणि त्यावेळी त्याला फिल्मी दुनियेत पाऊल ठेवता आले नाही. यानंतरही त्याची चित्रपटांची आवड कमी झाली नाही आणि तो प्रयत्न करत राहिला.याबद्दल बोलताना सिद्धार्थने एकदा सांगितले की, त्याला त्याच्या पहिल्या ऑडिशनमध्ये नकार मिळाला होता, त्यानंतर त्याला जाहिरातीची ऑफर मिळाली. 2010 मध्ये, त्याने करण जोहरच्या माय नेम इज खानमधून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. यानंतर करणने त्याला स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटात काम करण्याची संधी दिली.

या चित्रपटानंतर सिद्धार्थने मागे वळून पाहिले नाही. त्याने आपला अभिनय सुधारत राहिला आणि अनेक बड्या स्टार्ससोबत चित्रपटही करत राहिला. एक व्हिलन हा त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट म्हणता येईल. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कमाई केली. चित्रपटांव्यतिरिक्त सिद्धार्थला रग्बी खेळायला आवडते. या सगळ्याशिवाय सिद्धार्थ फिटनेसबाबतही खूप जागरूक आहे. अभिनेत्याच्या मते, जर तो एक दिवसही व्यायाम करत नसेल तर त्याला खूप विचित्र वाटते.आपल्या फिल्मी करिअरमध्ये सिद्धार्थने अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. कपूर अँड सन्स, हसी तो फसी, शेरशाह यांसारख्या चित्रपटांतील त्याच्या अभिनयाला लोकांची पसंती मिळाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने