अजय-रणबीर आमने सामने! कोण गाजणार, कोण आपटणार? मार्चमध्ये धुराळा

मुंबई: नव्या वर्षात वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या पठाणनं बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम केला आहे. वर्षाची सुरुवात तर मोठ्या धमाक्यानं झाली आहे. त्यामुळे येत्या काळात प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण, रणबीर कपूर, राणी मुखर्जी या बड्या कलाकारांचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगणचा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला दृष्यम चाहत्यांना भावला होता. आता नव्या वर्षात त्याचा भोला चित्रपट येतो आहे. त्याकडे चाहते लक्ष ठेवून आहेत.

1. भोला - मार्चच्या अखेरील अजयचा भोला प्रदर्शित होणार आहे. तो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. बॉलीवूडचे जे ट्रेड अॅनालिस्ट आहेत त्यांनी तर बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट होईल असे सांगितले आहे. अजयला देखील दृष्यमनंतर मोठ्या चित्रपटाची अपेक्षा आहे. त्यातील गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

2. ‘तू झूठी मैं मक्कार’ - ब्रम्हास्त्रनंतर रणबीर पुन्हा एकदा जोरदारपणे बॉक्स ऑफिसवर झळकणार आहे. त्याच्या जोडीला श्रद्धा कपूर दिसणार आहे. यापूर्वी या चित्रपटातील गाण्याला प्रेक्षकांनी मोठी दाद दिली आहे. ७ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ मोठी स्टारकास्ट घेऊन चित्रपटाला उंची देण्याचा प्रयत्न केला जात आहे.


3. मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे - बॉलीवूडची रणरागिणी म्हणून जिच्याकडे पाहिले जाते त्या राणी मुखर्जीचा मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वेचा ट्रेलर समोर आला आहे. त्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. राणीचा वेगळा अंदाज या चित्रपटाच्या निमित्तानं दिसून येणार आहे. येत्या १७ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

4. झ्गिवाटो - टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय चेहरा कपिल शर्माचा दुसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याचे नाव झ्गिवाटो असे आहे. कपिलला या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. नंदिता दास सारख्या मोठ्या दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

ओटीटीवर येणारे बॉलीवूडचे चित्रपट -

1. गुलमोहर - डिझ्नी हॉटस्टारवर गुलमोहर नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याचे प्रमोशन सध्या जोरदारपणे सुरु आहे. त्यामध्ये शर्मिला टागोर, मनोज वाजपेयी, अमोल पालेकर, सिमरन आणि सुरज शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर शर्मिलाजी या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

2. चोर निकल के भागा - नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या हिंदी चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता सनी कौशल आणि यामी गौतमी दिसणार आहे. चोरीची गोष्ट यावर आधारित या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने