शिव ठाकरेचं नशीब चमकलं, सलमान खानच्या चित्रपटात झळकणार

मुंबई: भारतातील सर्वात मोठा रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉसने अनेक स्पर्धकांचे नशीब उजळले आहे. शिव ठाकरेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिव बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.खरं तर, सध्या शिव ठाकरे बिग बॉस 16 मध्ये खूप चर्चेत आहेत. 'बिग बॉस 16'च्या नुकत्याच पार पडलेल्या एका भागात शिव ठाकरे आणि प्रियंका चाहर चौधरीने पती-पत्नी म्हणून एक नाटक केलं. या नाटकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आता शिव ठाकरेच्या संबंधित नवनवीन बातम्या समोर येत आहेत.खरं तर, एका मीडिया रिपोर्टनुसार, शिव ठाकरेच्या हातात सलमान खानचा चित्रपट आहे. या चित्रपटात शिव ठाकरेही एका खास भूमिकेत दिसणार आहेत. मात्र अद्याप त्याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र शिव ठाकरेंच्या चाहत्यांसाठी ही बातमी चांगलीच आहे.शिव ठाकरे व्यतिरिक्त, प्रियंका चाहर चौधरीबद्दल देखील अपडेट्स आले होते की प्रियंका देखील एका मोठ्या चित्रपटाचा भाग असेल. प्रियांका शाहरुख खानच्या डंकी या चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबतची माहिती सध्यातरी समोर आलेली नाही.भाईजानचा 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून अनेक स्टार्स बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. या चित्रपटात बिग बॉस 13 ची स्पर्धक शहनाज गिल दिसणार असून या चित्रपटातून तिचे बॉलिवूड डेब्यू होणार आहे.याशिवाय सलमान खानचा पुढचा चित्रपट टायगर 3 देखील याच वर्षी रिलीज होणार आहे. अलीकडेच सलमान खान बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटात दिसला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने