हळद लागली, नवरी नटली.. वनीताच्या हळदीत मराठी अभिनेत्रींनी केली धम्माल

मुंबई:  महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील वनिता खरात लवकरच सुमित लोंढे सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाआधी वनिताच्या गालावर हळद लागली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधल्या वनिताचे सर्व कलाकार मित्र मैत्रीण तिच्या हळदीला उपस्थित होते. अभिनेत्री नम्रता संभेराव वनीताच्या हळदीला उपस्थित होते. नम्रताने तिच्या सोशल मीडियावर वनीताच्या हळदीचे फोटो पोस्ट केले आहेत.नम्रता संभेराव सोबतच अभिनेत्री रसिक वेंगुर्लेकर, चेतना भट, शिवाली परब, प्रियदर्शनी, ओंकार राऊत, ईशा डे अनेक कलाकार वनिताच्या हळदीला उपस्थित होते. सगळ्यांनी पिवळ्या रंगाचे खास कपडे परिधान केले होते . नम्रताचा नवरा योगेश सुद्धा या हळदीत उपस्थित होता. नम्रताने पोस्ट केलेले फोटो पाहून वनीताच्या हळदीत या कलाकारांनी जबरदस्त धम्माल केलेली दिसतेय.सुमित आणि वनिता केली अनेक वर्षे रिलेशनशिप मध्ये आहेत. आता त्यांच्या नात्याला खऱ्या अर्थाने संमती मिळाली असून दोघेही लग्न करणार आहेत.सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. सुमीतने या आधी बऱ्याचदा दोघांचे एकत्र फोटो शेअर केले आहेत. पण वनिता मात्र हल्लीच त्यांच्या नात्याबाबत जाहीरपणे बोलू लागली. वनिता आणि सुमित यांचे प्री वेडिंग फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत होतं.काही दिवसांपूर्वी वनीताच्या घरी तिची मेहंदी सेरेमनी सुद्धा झाली. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील अभिनेत्री इशा डे, चेतना भट, प्रियदर्शनी आणि अभिनेत्री आरती मोरे असे अनेक कलाकार वनीताच्या मेहंदी सेरेमनीत धम्माल करताना दिसले. चेतना भट स्वतःच्या हातावर मेहंदी काढताना दिसली तर बाकीचे कलाकार सुद्धा हळदी आणि मेहंदीत नाचताना आणि धम्माल करताना दिसले. याशिवाय वनिता खरातच्या नवरा सुमित लोंढेने त्याचं आणि वनिताचं नाव एकत्र करून SuMEETवनी असं नाव त्याच्या हातावर मेहंदी स्वरूपात लिहिलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने