रितेश - जिनिलियाच्या 'वेड' मुळे अमृता खानविलकरला बसलाय हा फटका, काय घडलं नक्की?

मुंबई: रितेश देशमुख - जिनिलिया देशमुख या दोघांचा वेड सिनेमा ३० डिसेंबरला रिलीज झाला. वेडने आतापर्यंत ७० पेक्षा जास्त कोटींची कमाई केली. वेड लवकरच ८० कोटी कमावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेड एकीकडे सुपरहिट झाला पण त्याचा फटका मात्र अमृता खानविलकरला बसला. नक्की काय घडलं? अमृता खानविलकर आणि वेडचा संबंध काय? बघूया३० डिसेंबरला वेड सिनेमा रिलीज झाला. वेड सोबत अमृता खानविकरचा ऑटोग्राफ सिनेमा रिलीज होणार होता. अशाप्रकारे ३० डिसेंबरला वेड आणि ऑटोग्राफ या दोन्ही सिनेमांची टक्कर होणार होती. पण वेड समोर कोणतीही टक्कर होऊ नये म्हणून अमृता खानविलकरच्या ऑटोग्राफ सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.वेड रिलीज व्हायच्या आधी रोहित शेट्टीचा सर्कस रिलीज झालेला. पण सर्कस फ्लॉप ठरला. ऑटोग्राफची रिलीज डेट सुद्धा पुढे गेली. म्हणून वेड समोर कोणताही सिनेमा नव्हता. त्याचा फायदा वेड ला झाला आणि वेड सुपरहिट झाला.दुसरीकडे वेड आधीच अमृता खानविलकरच्या ऑटोग्राफ सिनेमाची घोषणा झाली होती. सतीश राजवाडे सिनेमाचे दिग्दर्शक होते. तर अमृता सोबत अंकुश चौधरी आणि उर्मिला कोठारे असे लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकेत होते. सिनेमा रोमँटिक वळणाचा होता. सिनेमातलं गाणं सुद्धा रिलीज होणार होतं. पण वेड समोर टक्कर नको म्हणून ऑटोग्राफ ची ३० डिसेंबर हि रिलीज डेट रद्द केली गेली.

आता अमृता - अंकुशच्या ऑटोग्राफ सिनेमाची नवीन रिलीज डेट अजून समोर आली नाहीये. तरीही ऑटोग्राफ सिनेमाची पुन्हा एकदा घोषणा लवकरच होईल याची चाहत्यांना आशा आहे.३० डिसेंबरला बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा 'वेड' रिलीज झाला. रितेशचा दिग्दर्शक म्हणून तर जिनिलियाचा अभिनेत्री म्हणून मराठीतला हा पहिलाच सिनेमा आहे. रितेश व जिनिलीयाच्या 'वेड' बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे.वेडने रेकॉर्डतोड कमाई करत सर्वांच्या भूवया उंचावल्या. लोकांकडून मिळणारा प्रतिसाद बघता काही दिवसानानंतर वेड सिनेमात काही नवीन सीन्स आणि 'वेड तुझा' या गाण्याचं नवीन व्हर्जन समाविष्ट करण्यात आलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने