'पैसे काय काय करायला लावतात..', सलमान-अक्षयचा व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते नाराज..

मुंबई:   बॉलीवूडचे सुपरस्टार्स सलमान खान आणि अक्षय कुमार जिथे जातात तिथे आपला दबदबा निर्माण करतात. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारनं सलमान खान सोबत एक व्हिडीओ शेअर केला होता.त्यात दोघे डान्स करताना दिसत होते. त्या दरम्यान दोघांचा आणखी एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पुन्हा सलमान खान आणि अक्षय कुमार जोरदार डान्स करताना दिसले पण त्यानंतर मात्र त्यांच्यावर ट्रोलर्सनीि जोरदार निशाणा साधला. हा व्हिडीओ दिल्लीतील एका ग्रॅन्ड वेडिंग मधला आहे. जिथे सलमान आणि अक्षयनं एक परफॉर्मन्स दिला होता. यांच्या व्यतिरिक्त दिसत आहे की या इव्हेंटला मनिष पॉलनं होस्ट केलं आहे.या लग्नसोहळ्यात सामिल होऊन सलमान आणि अक्षयनं चारचॉंद लावले. सलमानने कितीतरी गाण्यांवर डान्स केला. ज्यामध्ये 'तेरी मेरी प्रेम कहानी','जवानी फिर ना आए' सारख्या गाण्यांचा समावेश आहे.तर अक्षय कुमारनं या ग्रॅंड वेडिंगमध्ये आपला सिनेमा प्रमोट केला. लग्नात अक्षय कुमार आपल्या आगामी 'सेल्फी' सिनमातील गाण्यावर जोरदार थिरकला. सिनेमातील गाणं 'मै खिलाडी तू अनाडी 'ला 'सेल्फी' साठी रिक्रिएट केलं गेलं आहे.एकीकडे जिथे लग्नात उपस्थित असलेले सगळेच सलमान आणि अक्षयच्या या डान्सचा आनंद लुटताना दिसत आहेत..तिथे दोघा स्टार्सचं असं नाचणं त्यांच्या चाहत्यांना मात्र खटकलं आहे.

सोशल मीडियावर त्यांचे चाहते अभिनेत्यांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. एका नेटकऱ्यानं व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं आहे की,'पैशासाठी काय काय करावलं लागतं यांना'. तर आणखी एकानं लिहिलं आहे की,' पैशांसाठी कसे नाचतायत बघा..',तर काही लोकांनी सलमान अक्षयला कोणत्या लग्नात नाचत आहात असा सवालही केला आहे. आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'पैशानं सगळं करवून घेतलं जाऊ शकतं'. तर सलमानच्या एका चाहत्यानं नाराज होत त्या व्हिडीओवर लिहिलं आहे, 'सलमान भाई,काय गरज होती नाचायची..'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने