भारत - ऑस्ट्रेलिया सामन्यात आजपर्यंत कधीही असं घडलं नाही, विराटनं स्मिथच्या...

मुंबई:  विराट कोहली जेव्हापासून ब्रेकवरून परतला आहे तेव्हापासून त्याच्या फॉर्ममध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. या बदलाचे गमक हे नीम करोली बाबा यांच्या आश्रमातील भेटीत दडलंय हे आपण गेल्या काही दिवसापूर्वीच पाहिले होते. विराट कोहली ज्या ज्या वेळी छोट्या ब्रेवर जातो त्या त्यावेळी तो नीम करोली बाबांच्या आश्रमात गेल्याचे दिसते.आध्यात्मिक टूरिझमचा विराट कोहलीच्या फॉर्मवर नाही तर संपूर्ण व्यक्तीमत्वावर सकारात्मक फरक पडला आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या सामन्यात विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत अक्षर पटेलचे षटक संपल्यानंतर स्लीपमध्ये उभ्या असलेला विराट कोहली दुसऱ्या एन्डला जात होता. त्यावेळी तो स्टीव्ह स्मिथच्या खांद्यावर हात टाकत, स्माईल करताना दिसत आहे. विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ यांच्यात यापूर्वी अनेकवेळा वादाचे प्रसंग घडले होते.मात्र विराट कोहली वेळोवेळी स्टिव्ह स्मिथच्या मागे खंबीरपणे उभा राहिला आहे. 2019 च्या वर्ल्डकपमध्ये भारत - ऑस्ट्रेलिया सामन्यावेळी प्रेक्षक स्टीव्ह स्मिथला टोमणे मारत होते त्यावेळी विराट कोहलीनेच प्रेक्षकांना शांत बसण्यास सांगितले होते.आजच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दोन सत्रातच 177 धावात संपवला. भारताकडून पुनरागमन करणाऱ्या रविंद्र जडेजाने 47 धावात निम्मा संघ ( 5 विकेट्स) गारद केला. तर अश्विनने 3 कांगारू टिपून त्याला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशानेने सर्वाधिक 49 धावा केल्या.त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने दिवसअखेर 1 बाद 77 धावांपर्यंत मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीने 1 विकेट घेतली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी रोहित शर्मा 56 धावांवर तर नाईट वॉचमन आर. अश्विन शून्य धावा करून नाबाद होता. भारत पहिल्या डावात अजून 100 धावांनी मागे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने