हे तर मोठे षडयंत्र... सेहवाग अदानींवरील हिंडनबर्ग रिपोर्टवर हे काय म्हणाला?

मुंबई: हिंडनबर्गच्या अहवालानंतर भारतीय बाजारपेठेतील प्रमुख समूहांपैकी एक असलेल्या अदानी समूहाला मोठा धक्का बसला आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होताना दिसत आहे. या अहवालानंतर त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात येत आहेत. अदानी प्रकरणी नरेंद्र मोदी सरकारवर विरोधकांनी जोरदार हल्ला चढवण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, या प्रकरणात भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने उडी घेतली आहे. 



सेहवागने ट्विट शेअर कर अप्रत्यक्षपणे 'हिंडेनबर्गवर हल्ला चढवला आहे. गोऱ्या लोकांना भारताची प्रगती सहन होत नाही. इतक नाही तर हे संपूर्ण प्रकरण म्हणजे नियोजित गट आहे.' असा धक्कादायक दावा सेहवागने केला आहे.तसेच, किती ही प्रयत्न करा, पण भारत नेहमी प्रमाणे अजून मजबूतीने उभा राहिल. असही सेहवागने ट्विटमध्ये विश्वास व्यक्त केला आहे. सेहवागचे हे ट्वीट काही वेळातच व्हायरल होऊ लागले. यावर सर्व चाहत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. अनेकांनी त्याच्या या ट्वीटला सहमतीही दर्शवली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने