Pathaan नंतर आता हृतिकच्या War 2 साठी तयार रहा.. सलमान - शाहरुख - हृतिकच्या अॅक्शनचा जलवा

मुंबई: शाहरुखचा पठाण बॉक्स ऑफिसवर अजूनही धुमाकूळ घालतोय. शाहरुखच्या करियरचा आजवरचा सर्वात यशस्वी सिनेमा म्हणून पठाण ची गणती होतेय. पठाण निमित्ताने यश राज फिल्म्स त्यांचं अनोखं स्पाय युनिव्हर्स तयार करत आहे. पठाण नंतर आता यशराज फिल्मसच्या आगामी वॉर सिनेमाची जोरदार तयारी सुरु आहे.सध्या ट्विटरवर वॉर २ हा ट्रेंड व्हायरल होतोय. बॉलिवूड रिपोर्टनुसार War 2 चे स्क्रिप्टिंग पूर्ण झाले आहे आणि या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाची निर्मिती केली जाईल.मागील पाचही स्पाय सिनेमांचा हा एक मोठा क्रॉसओव्हर असेल. पठाण आणि वॉरच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन केलेला सिद्धार्थ आनंद War 2 या सिनेमाचे दिग्दर्शन करणार कि नाही हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.वॉर २ या स्पाय युनिव्हर्सच्या पुढील भागात हृतिक कबिरच्या भूमिकेत असणार आहे. याशिवाय सलमानचा टायगर, शाहरुखचा पठाण आणि हृतीकने साकारलेला कबीर एकत्र येणार आहेत.असं झाल्यास War 2 हा आजवरचा हिंदी इंडस्ट्रीतला मोठा सिनेमा ठरणार आहे. तिन्ही सुपरस्टारला एकत्र बघण्याची संधी यानिमित्ताने प्रेक्षकांना मिळणार आहे.सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित वॉरच्या पहिल्या भागाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळाले. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ या दोघांची जबरदस्त ऍक्शन वॉर सिनेमात दिसली.

हृतिक रोशनची खास हेअरस्टाईल, त्याची बॉडी, त्याचा लूक अशा अनेक गोष्टींची चर्चा झाली. War 2 आल्यानंतर हृतिकच्या फॅन्ससाठी मोठी ट्रीट असेलच शिवाय सलमान - शाहरुख सुद्धा War 2 मध्ये दिसले तर थिएटरमध्ये हाऊसफुल्लच्या पाट्या झळकतील यात शंका नाही.War 2 च्या आधी सलमानचा टायगर ३ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सलमान - कतरीना पुन्हा एकदा टायगर आणि झोयाच्या भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतील. तर टायगर ३ मध्ये इम्रान हाश्मी खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने