फर्जीचा 'मायकल' अन् फॅमिली मॅनचा 'श्रीकांत तिवारी' काय आहे कनेक्शन? मायकलनं तर...

मुंबई:   वेब मनोरंजन विश्वामध्ये काही मालिकांनी प्रेक्षकांची अमाप पसंती मिळवली त्यामध्ये द फॅमिली मॅनचे नाव घ्यावे लागेल. यापूर्वी सेक्रेड गेम्स, मिर्झापूर, गुल्लक, पंचायत सारख्या मालिकांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. मात्र फॅमिली मॅनची गोष्टच वेगळी आहे. काही दिवसांपूर्वी मनोज वाजपेयीनं फॅमिली मॅनच्या दुसऱ्या सीझनविषयी सांगितले होते.सध्या अॅमेझॉन प्राईमवर फॅमिली मॅनच्या दिग्दर्शकांची फर्जी नावाची मालिका प्रदर्शित झाली आहे. त्यामध्ये बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहीद कपूर आणि टॉलीवूडचा विजय सेतूपती यांच्या प्रमुख भूमिका आहे. सोशल मीडियावर फर्जीची खूप चर्चा आहे. प्रेक्षकांना ही मालिका खूप आवडली आहे. यासगळ्यात फर्जी आणि फॅमिली मॅनची चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्यामध्ये काही कनेक्शन असल्याच्या बातम्याही व्हायरल झाल्या आहेत.फर्जीमध्ये एक ट्विस्ट दाखवण्यात आला आहे. जो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. त्यामुळे अनेकजण फर्जी आणि द फॅमिली मॅन यांची तुलना करत आहे. यातील नेमका काय प्रकार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या फर्जीमधील पोलिस अधिकारी विजय सेतूपती हा फॅमिली मॅनच्या श्रीकांत तिवारी अर्थात मनोज वाजपेयीची मदत मागताना दाखवण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आगामी काळात फॅमिली मॅनच्या सीझनमधील काही गोष्टींचा उलगडा झाला आहे.अॅमेझॉन प्राईमनं त्यांच्या इंस्टा अकाउंटवरुन एक लेटेस्ट व्हिडिओ शेयर केला होता. त्यामध्ये त्यानं म्हटलं होतं की, फर्जीमधील पोलिस अधिकारी विजय सेतूपती हा फॅमिली मॅनमधील श्रीकांत तिवारी मनोज वाजपेयीची मदत घेताना दिसणार आहे. ही तुमच्यासाठी आगळी वेगळी ट्रीट असणार आहे. तुमचा गोंधळ होणार नाही याची काळजी आम्ही घेतली असून तुमच्यासाठी हे एकप्रकारे सरप्राईज असणार आहे. असेही त्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

फर्जीचा मायकल आणि फॅमिली मॅनचा श्रीकांत तिवारी यांच्यातील कनेक्शन जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांना फॅमिली मॅनच्या पुढच्या सीझनचे वेध लागले आहे. मायकलला काही करुन सनीला (शाहिद कपूरला) पकडायचे आहे. त्याच्यावर बेकायदेशीरपणे नोटा छापण्याचा आरोप आहे. त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. यासगळ्यात मायकलला श्रीकांत तिवारीची मदत हवी आहे.श्रीकांत तिवारी आणि मायकल यांच्यातील तो संवाद आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे येत्या काळात रिलिज होणाऱ्या फॅमिली मॅनच्या सीझनविषयी प्रेक्षकांच्या उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पण अनेकांनी हा फॅमिली मॅनचे प्रमोशन करण्याची आयडिया असल्याचे म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने