कोणाच्या हातात जाणार बिग बॉसची ट्रॉफी..निकाल अनपेक्षित ठरणार का? काय म्हणतंय ट्वीटर?

मुंबई:  बिग बॉस 16 चा फिनाले अखेर जवळ येऊन ठेपला. सलमान खान होस्ट करणार असलेल्या या शो च्या ग्रॅंड फिनालेत सध्या टॉप 5 मध्ये पोहोचलेयत..प्रियंका चाहर चौधरी, शिव ठाकरे,एम सी स्टॅन,अर्चना गौतम आणि शालिन भनोट.फिनालेआधी बिग बॉसमध्ये टॉप 5 स्पर्धकांचा शो दरम्यानचा संपूर्ण प्रवास दाखवला गेला. हा फिनाले एकदम दिमाखदार सोहळा असणार असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये बॉलीवूडमधील तसंच टी.व्ही वरचे अनेक स्टार्स उपस्थित राहून सोहळ्याला चारचॉंद लावणार आहेत.

सिने-निर्माता आणि 'खतरों के खिलाडी'चा होस्ट रोहित शेट्टी देखील या फिनाले दरम्यान उपस्थित राहणार आहे.तसं पाहिलं तर आता अनेक जण अनेक अंदाज लावताना दिसत आहेत. काहींना प्रियंका चाहर चौधरी विनर बनेल असं वाटत आहे तर काहींना अर्चना गौतम तर काहींना शिव ठाकरे.आता समोर आलेल्या माहितीनुसार ही तीन नावं टॉप 3 मध्ये असतील असं बोललं जात आहे. यामध्ये आता नवीन अपडेट ट्वीटरवरनं समोर आलीय ती म्हणजे तिथे सर्वात जास्त शिव ठाकरेचं पारडं जड दिसत आहे. तिथे अनेकांनी शिव ठाकरेच विनर होईल असं आपल्या ट्वीटच्या माध्यमातून म्हटलं आहे.असं झालं तर अनेकांसाठी तो अनपेक्षित निकाल असेल. कारण शिवच्या तुलनेत प्रियंका चाहर चौधरी विनर बनेल असा अंदाज अेनकांनी आतापर्यंत वर्तवला आहे.शिव ठाकरे हा मराठी बिग बॉस 2 चा विनर होता. मराठीच्या त्या सिझनमध्ये शिवमधला मराठी माणूस,साधं राहणं,वागणं,त्याच्यातील लिडरशीप क्वालीटी सगळ्यांनाच भावली होती आणि याच गुणांच्या बळावर शिव ठाकरे मराठी बिग बॉस सिझन 2 चा विजेता ठरला होता.आता हिंदी बिग बॉसमध्ये देखील शिवचे हेच गुण चर्चेत आहेत. बिग बॉसनं देखील फिनाले आधी त्याचा शो मधील प्रवास दाखवताना त्याला 'दिलदार..राजा माणूस' अशा उपमा देत त्याची प्रशंसा केली.त्यामुळे प्रियंकाला विनर बनण्यापासून कोण रोखेल तर तो शिव ठाकरेच असा आवाज सध्या तरी ट्वीटरवर ऐकण्यास मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने