'प्रियंकाच्या हातात बिग बॉसची ट्रॉफी! जिंकली की काय?'

मुंबई: बिग बॉसच्या यंदाच्या पर्वामध्ये ज्या स्पर्धकानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे त्या प्रियंका चौधरीच्या नावाची मोठी चर्चा आहे. परवा या शोचा फिनाले पार पडणार आहे. त्याची सोशल मीडियावर जोरदापर चर्चा असल्याचे दिसून आले आहे. आता तर प्रियंकाचा बिग बॉसची ट्रॉफी घेतल्याचा फोटो व्हायरल झाला असून त्याला लाखो चाहत्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे.बिग बॉसचा होस्ट सलमान खानकडून देखील प्रियंकाला खूप ओरडा खावा लागला आहे. मात्र प्रियंकानं मोठ्या संयमानं स्वताला साऱ्या गोंधळापासून वाचवलं आहे. त्यामुळे तिनं रागाच्या भरात कोणतीही टोकाची प्रतिक्रिया दिलेली नाही. याचा परिणाम असा की, तिच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. सोशल मीडियावर तर अनेकांनी प्रियंकाला संभाव्य विजेता म्हणून घोषित केले आहे.यावर्षीच्या सीझनमध्ये सर्वाधिक प्रभावशाली आणि प्रबळ दावेदार म्हणून प्रियंकाकडे पाहिले जात आहे. प्रियंकाची स्पर्धा शालिन, शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि अर्चना गौतम यांच्याशी असल्याचे दिसून आले आहे. टॉप फाईव्हमध्ये तर गेली आहे. मात्र त्यातून ती विजेता होणार असल्याची चर्चा सर्वाधिक व्हायरल होत आहे. फिनाले पूर्वीच प्रियंकाचा एक फोटो व्हायरल होतो आहे त्यामध्ये तिनं हातात बिग बॉसची ट्रॉफी घेतली आहे. त्यावर तिला वेगवेगळ्या प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत.पूर्ण सीझनमध्ये प्रियंकानं आपल्या प्रभावी खेळानं प्रेक्षकांना आणि चाहत्यांना जिंकून घेतलं आहे. त्यांनी तिच्या आतापर्यतच्या परफॉर्मन्सवर कौतूकाचा वर्षाव केला आहे. त्यामुळे प्रियंकाच्या लाखो चाहत्यांना ती विजयी होईल अशी खात्री आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने