बागेश्वर बाबांच्या अडचणी वाढल्या! प्रेत दरबारातून तरुणी गायब, महिलेचाही मृत्यू

भोपाळ: छतरपूरमध्ये बागेश्वर धामच्या दर्शनासाठी गेलेली एक तरुणी बेपत्ता झाली आहे. कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तर फिरोजाबाद येथून आलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बागेश्वर धाम उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले आहेत. कथेदरम्यान ते दरबार लावतात. या दरम्यान, ते एक स्लिप तयार करतात आणि भक्ताने सांगण्यापूर्वी भक्ताच्या समस्या लिहून ठेवतात. त्यामुळे हजारो लोक हनुमान मंदिरात दर्शनासाठी आणि स्लिप सादर करण्यासाठी बागेश्वर धाम गाठत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशाच्या देवरिया जिल्ह्यातील देवकली जयराम निवासी ओमप्रकाश मौर्या यांची कन्या १२ फेब्रुवारीपासून बेपत्ता आहे. तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी बागेश्वर धामच्या प्रेत दरबारातून बेपत्ता झाली आहे. बागेश्वर धाममधून भक्त आणि सामान बेपत्ता होण्याची ही पहिली घटना नाही. काही दिवसांपूर्वीच बागेश्वर धाम यांच्या पत्रकार परिषदेच्या दिवशी दोन गाड्यांची चोरी झाली होती.दरम्यान स्लिप जमा करण्यासाठी आलेल्या नीलम देवी महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार आपली पत्नी मागील अनेक दिवसांपासून आजारी होती. आम्ही रोजी परिक्रमा करत होता. मात्र बुधवारी पत्नीची तब्येत अचानक खालावली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने