पाकच्या हारमध्ये भारताची जीत! पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर? काय आहेत भारताची समीकरणं

मुंबई:   ICC महिला T20 विश्वचषक 2023 हंगामात अप्रतिम सामने पाहायला मिळत आहे. रविवारी रात्री झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला वेस्ट इंडिजकडून 3 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ विश्वचषकातून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. या स्पर्धेतील पाकिस्तानचा हा दुसरा पराभव आहे, याआधी टीम इंडियाकडून पराभव झाला होता.पाकिस्तानच्या या पराभवामुळे भारताने उपांत्य फेरी गाठण्याचे समीकरण आणखी सोपे झाले आहे. टीम इंडियाला आज ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे, हरमनप्रीत कौर अँड कंपनी हा सामना जिंकून इंग्लंडसोबत ग्रुप-बी मधून उपांत्य फेरीत प्रवेश करेल. जर आज आयर्लंडने भारताला मोठ्या अपसेटमध्ये पराभव केला, तर पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडतील.



ग्रुप-बी च्या पॉइंट टेबलवर एक नजर टाकली तर, विजयाची हॅट्ट्रिकसह इंग्लंड पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याचबरोबर भारत आणि वेस्ट इंडिजचे संघ 4-4 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. पाकिस्तानचे आतापर्यंत दोन गुण झाले असून चौथ्या स्थानावर आहे. आयर्लंडला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही आणि तो आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे.भारताला महिला टी-20 विश्वचषक 2023च्या उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल तर त्यांना आयर्लंडवर कोणत्याही परिस्थितीत विजय नोंदवावा लागेल. जर टीम इंडिया आज आयर्लंडला पराभूत करण्यात यशस्वी ठरली तर त्यांचे 6 गुण होतील आणि ते इंग्लंडसह उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

जर आयर्लंडने जबरदस्त अपसेट खेचून भारताचा पराभव केला तर पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडतील. या पराभवानंतर टीम इंडिया 4 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहील. अशा स्थितीत पाकिस्तानला शेवटचा सामना जिंकून 4 गुण गाठण्याची संधी असणार आहे. पाकिस्तानने शेवटचा सामना जिंकला तर उपांत्य फेरीत प्रवेश करतील कारण त्यांचा निव्वळ रनरेट भारतापेक्षा चांगला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने