'माझ्या ऐका स्टेटमेंटमुळं गेमचं..', जय भानुशालीच्या ट्विटनं वेगळ्याच चर्चेला सुरुवात...

मुंबई: बिग बॉस 16 च्या ग्रॅंड फिनालेमध्ये काल मोठ्या उत्साहात पार पडला. यंदाची ट्रॉफी कोण जिंकणार याची जोरदार चर्चा रंगली होती मात्र एमसी स्टॅनने ट्रॉफीवर त्याचं नावं कोरलं आहे. प्रियंका ही या ट्रॉफीची दावेदार होती. तिचं यंदाचा सिझन जिंकणार असं सर्वांनाच वाटलं होतं मात्र तसं झालं नाही. दरम्यान एमसी स्टॅनला जिंकल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. त्यातच आता जय भानुशालीच्या एका ट्विटची चर्चा रंगली आहे.बिग बॉस 16 चा विनर घोषित झाल्यानंतर बिग बॉस 14 चा स्पर्धक आणि टीव्ही अभिनेता जय भानुशाली याने एमसी स्टेनचे वेगळ्या पद्धतीने अभिनंदन केले आहे. त्याने लिहिले की मला म्हणायचं आहे की माझ्या एका विधाननं पुर्ण प्रथाच बदलली आहे. जय भानुशालीच्या या कमेंटवर यूजर्स आता प्रतिक्रिया देत आहेत.
त्याच झालं असं की, काही दिवसांपूर्वीच एका रिपोर्टरनं जय भानुशालीला प्रश्न केला होता. अर्चना गौतम, शिव ठाकरे, स्टॅन की प्रियंका चाहर कोण असेल बिग बॉस १६ चा विनर? यावर जयनं पटकन म्हटलं की, ''यामधून कलर्स वाहिनीसाठी काम करणारा कोण आहे?'' तेव्हा रिपोर्टर पटकन म्हणाला,''प्रियंका चहर...'',तेव्हा जय म्हणाला,''बस्स..मग तिच यंदाचा सिझन जिंकणार. आणि त्यातनंच जर संधी मिळाली तर नशिबानं शिव ठाकरे जिंकू शकतो''.शो च्या ग्रॅंड फिनालेत टॉप 5 मध्ये प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे,एम सी स्टॅन,अर्चना गौतम आणि शालिन भनोत होते. अखेर फॅन्सच्या प्रेमामुळे सर्वांवर भारी पडून एम. सी. स्टॅन बिग बॉस १६ चा विजेता झाला

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने