'पुष्पा' आणि 'पठाण' एकत्र.. Shah Rukh Khan आणि Allu Arjun या सिनेमात येणार आमनेसामने

मुंबई: शाहरुख खानच्या  फॅन्स पठाण पाहून एकदम खुश झाले आहेत. पठाणने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केलीय. शाहरुखच्या चाहत्यांनी पठाण पाहण्यासाठी गर्दी केली. आता शाहरुखच्या फॅन्ससाठी आणखी मोठी पर्वणी असणार आहे. शाहरुख खान आता साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन सोबत काम करणार असल्याची दाट शक्यता आहे.शाहरुख आणि अल्लू अर्जुन एकत्र येण्याचं कारण सुद्धा काहीस खास आहे. पठाण नंतर शाहरुखचा जवान सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख जवानच्या शूटिंगला रवाना झालाय.

पठाण नंतर शाहरुखचा जवान हा सिनेमा ३ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साऊथचा लोकप्रिय दिग्दर्शक अॅटली जवानचं दिग्दर्शन करणार आहे. याच जवान सिनेमात शाहरुख आणि अल्लू अर्जुन एकत्र झळकणार असल्याची शक्यता आहे.नुकत्याच आलेल्या मोठ्या बातमीनुसार जवानचा दिग्दर्शक अॅटली याने साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला सिनेमातील एका महत्वाच्या भूमिकेसाठी विचारणा केलीय. अल्लू अर्जुन जवान मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असेल पण त्याचा छोटा रोल अत्यंत महत्वाचा असेल.सध्या अॅटली यांनी अल्लू अर्जुनला या सिनेमासाठी विचारणा केलीय. अल्लू अर्जुनचा होकार येताच अॅटली जवान सिनेमातील त्याच्या महत्वाच्या भूमिकेचं शूटिंग करतील.असं झाल्यास शाहरुख आणि अल्लू अर्जुन एकाच सिनेमात झळकतील. आणि दोघांच्या फॅन्ससाठी मोठी पर्वणी असेलकाहीच दिवसांपूर्वी 'जवान' चा टीझर प्रेक्षकांचा भेटीला आलेला. या टिझरमध्ये शाहरुख खानचा लूक पाहून सगळेच थोडे शॉक झालेला. 'जवान' बनलेला किंग खान खतरनाक लूक मध्ये दिसत आहे.नेहमीच रोमॅंटिक हिरोची भूमिका साकारणाऱ्या शाहरुखला याआधी क्वचितच आपण अशा भूमिकेत पाहिलं असेल.शाहरुखचा पूर्ण चेहरा,डोकं आणि हाता-पायावर पट्ट्या बांधलेल्या आहेत. हा टिझर पाहिल्यानंतर शाहरुख खानचा 'जवान' सुद्धा बॉक्स ऑफिसवर नक्कीच धमाका करेल यात शंका नाही.'जवान' एक अॅक्शन सिनेमा आहे. २ जून,२०२३ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 'जवान' सिनेमा तामिळ,तेलगू,मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित केला जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने