मस्कला दुसरा क्रमांक मान्यच नाही; अब्जाधीशांच्या यादीत पुन्हा टॉपला

अमेरिका: जगातल्या अब्जाधीशांची नवी यादी प्रसिद्ध झाली आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्कने पुन्हा एकदा या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. या यादीनुसार, आता मस्क जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरला आहे.मस्कच्या संपत्तीमध्ये गेल्या २४ तासांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आता इलॉन मस्कची संपत्ती १८७ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. त्यामुळे १८५ अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले, आत्तापर्यंतचे पहिल्या क्रमांकाचे उद्योगपती बर्नार्ड अर्नाल्ट आता दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत.Bloomberg Billionaires Indexनुसार, इलॉन मस्कच्या संपत्तीमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ६.९८ अब्ज डॉलर्स इतकी वाढ झाली आहे. यामुळे इलॉन मस्कने या यादीमध्ये पुन्हा पहिला क्रमांक मिळवला आहे.दुसऱ्या क्रमांकावर बर्नार्ड अर्नाल्ट तर तिसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस आहे. त्यांची संपत्ती ११७ अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्या खालोखाल बिल गेट्स आणि वॉरन बफेट आहेत. त्यांची अनुक्रमे संपत्ती ११४ आणि १०६ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने