'हिला दिया'; आदित्य ठाकरेंनी CM शिंदेंना पुन्हा डिवचलं!

मुंबई:  शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वरळी विधानसभेतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे. त्यानंतर शिंदे गट आक्रमक प्रतिक्रिया देत आहेत. यानंतर आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी शिंदे गटासह मुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे.याविषयी आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, "माझ्या विधानावरुन भरपूर चर्चा झाली. सोशल मीडियावरही हाच विषय चालू होता. एक नक्की...हिला दिया. एवढ्या सगळ्यांनी ट्वीट करण्यापेक्षा स्वतः सांगितलं असतं की लढायची ताकद नाहीय, हिंमत नाहीय, तरी चाललं असतं."मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या वरळी इथल्या सत्कार कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत. तिथे शिंदे काय बोलतात, याकडे आता लक्ष लागून राहिलेलं आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून वरळीतही ठाकरे गटाकडून पदाधिकारी ओढण्याचं काम सुरू आहे. नुकतंच वरळीतले शिवसेनेचे माजी नगरसेवक संतोष खरात यांनी बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतरच आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना निवडणूक लढण्याचं आव्हान दिलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने