कर्णधार अन् उपकर्णधारावर पैशांचा पाऊस! २ मिनिटांत झाल्या करोडपती

मुंबई: भारतासह जगभरातील महिला क्रिकेटपटूंसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. जगातील सर्वात मोठ्या महिला टी 20 लीग वुमन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी आज मेगा लिलाव होणार आहे. या लिलावात जगभरातील 409 महिला क्रिकेटपटू आपले नशीब आजमावून पाहणार आहेत.WPL 2023 लिलावाची सुरूवातच स्मृती मानधनाने झाली. स्मृतीचे नाव घेताच मुंबई इंडियन्सने हात वर केला. यानंतर आरसीबीने लिलावात उडी घेत स्मृतीची बोली क्षणार्धात 2 कोटीच्या पुढे नेली अखेर आरसीबीने स्मृतीला 3.40 कोटी रूपयाला खरेदी केले.मुंबई इंडियन्सने स्मृती मानधनासाठी चांगले प्रयत्न केले. मात्र आरसीबीने बाजी मारली होती. अखेर मुंबईला स्मृती नाही तर हरमनप्रीत कौर मात्र मिळाली. त्यांनी हरमनप्रीतवर 1.8 कोटी रूपयांची बोली लावली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने