'मला नोकरी द्या, नाहीतर मी दुसऱ्यासोबत पळून जाईन'; तरूणीचं थेट उपमुख्यमंत्र्यांना पत्र

बिहार: सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. सध्या देशभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात असून अनेकजण आपल्या आवडत्या व्यक्तीला लग्नाची आणि प्रेमाची मागणी घालत असतात. तर सध्या असाच एक फोटो व्हायरल होत असून बिहार येथील एका तरूणीने थेट उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना पत्र लिहिलं आहे.सदर मुलगी प्रभात नावाच्या एका मुलावर एकतर्फी प्रेमात आहे. पण या तरूणीकडे नोकरी नाही. तर मला नोकरीचं काहीतरी जुगाड करून द्या नाहीतर मी दुसऱ्यासोबत पळून जाईल अशी मागणी या तरूणीने उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर तिने लिहिलेली चिठ्ठी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.सदर मुलीने लिहिलंय की, "डियर तेजस्वी जी, आपल्याला माहिती आहे की, मी सध्या टेन्शन मध्ये आहे. तुम्ही तर लव मॅरेज केलं पण आमच्या लग्नावर बेरोजगारीचं सावट पसरलं आहे. मी चार वर्षापासून प्रभात बांधूल्या या तरूणावर एकतर्फी प्रेम करते. अफेयरच्या वयात करंट अफेयर वाचत आहे. नोकरी लागल्यावर प्रपोज करेन असा विचार केला होता पण नोकरी लागत नाही. जागाही निघत नाहीत. आणि जागा निघाल्या तर पेपर लीक होतात. हे बघून यावर्षीचा व्हॅलेंटाईनसुद्धा असाच निघून जाईल आणि मी प्रपोज सुद्धा करू शकणार नाही असं वाटतं.

मी परिक्षेचा अभ्यास करतेय आणि माझे वडील माझ्या लग्नाच्या तयारीला लागले आहेत. माझ्या सोबतच्या सगळ्या मैत्रिणींना तर मुलंही झाले. हे बघून मनाला खूप लागतं. मोठ्या आशेने चिठ्ठी लिहित आहे. एखाद्या नोकरीचं जुगाड लावा नाही तर लेखक दुसऱ्या एखाद्यासोबत फरार होईल. प्रेमाशिवाय नोकरी घेऊन काय करणार.. आपलीच मतदार आणि प्रभात बांधूल्याची एकतर्फी प्रेमिका पिंकी (पटणामधून)..." असं पत्र पिंकी या तरूणीने लिहिलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने