'मॅडम तुम्ही अजुनही खूप सुंदर दिसता!' 71 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री इंस्टावर

मुंबई: बॉलीवूडमधील ७०-८० च्या दशकांतील चित्रपटांचा आनंद ज्या प्रेक्षकांनी घेतला असेल त्यांना जीनत अमान कोण आहे हे नव्यानं सांगण्याची काही गरज नाही. गेल्या काही दिवसांपासून जीनत अमान या वेगवेगळ्या माध्यमातून चाहत्यांशी, प्रेक्षकांशी संवाद साधत असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी काही रियॅलिटी शोमधून देखील आपल्या हजरजबाबीपणाची ओळख करुन दिली आहे.जीनत अमान यांची वेगळ्या अर्थानं ओळख करुन देण्याची गरज नाही. ज्याकाळात बोल्डनेस हा एका मर्यादेपर्यत होता तेव्हा या अभिनेत्रीनं त्याचे सगळे नियम धुडकावत आपल्या नावाची वेगळी छाप त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर उमटवली होती. आता जीनत अमान या चर्चेत आल्या आहेत त्याचे एक खास कारण आहे. त्यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी इंस्टावर पदार्पण केलं आहे. त्यांचे ते फोटो पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.जीनत अमान यांच्या त्या फोटोंवर एका चाहत्यानं म्हटलं आहे की, मॅडम तुम्ही अजुनही खूप सुंदर दिसता आहात. कोणताही मेकअप न करता, लायटिंग न करता, सजावट न करता एकदम साधेपणानं काढलेल्या त्या फोटोंमध्ये जीनत अमान सुंदर दिसत आहेत. तो फोटो त्यांच्या चाहत्यांना, नेटकऱ्यांना भावला आहे. त्यामुळेच की काय चाहत्यांनी त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

जीनत यांनी तो फोटो शेयर करताना एक पोस्ट देखील शेयर केली आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्या ७० च्या दशकांतील काही आठवणींना शब्दरुप दिले आहे. त्या पोस्टमध्ये जीनतजी म्हणतात, मी त्यावेळच्या पुरुषप्रधान बॉलीवूडमधील एकमेव अभिनेत्री होते ती सेटवर बिनधास्तपणे वावरत असे. तो काळ वेगळा होता. खूप दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या अनेक प्रेरणादायी आठवणी आहेत. त्यांच्याबरोबर केलेलं फोटोशुट देखील अजुनही लख्खं आठवतं. नेटकऱ्यांनी जीनत अमान यांच्या त्या पोस्टचे कौतूक केले आहे. त्यावर त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. १९७० मध्ये मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनलचा मुकूट आपल्या नावावर करणाऱ्या जीनतजींनी दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने