राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी वाचले जुने बजेट; विरोधक म्हणाले, हे तर...

राजस्थान: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री गेहलोत यांनी विधानसभेत जुना अर्थसंकल्प वाचून दाखवला.मात्र, मंत्री महेश जोशी यांनी त्यांना मध्येच रोखले. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.मुख्यमंत्री गेहलोत विधानसभेत अर्थसंकल्प वाचत असताना विरोधी पक्षनेत्यांनी गदारोळ सुरू केला. यावेळी अशोक गेहलोत यांनी थोडा धीर धरा असे सांगितले. त्याचवेळी मंत्री महेश जोशी म्हणाले की, तुमच्याकडे सर्वांचे लक्ष आहे. हे चुकीचे आहे.

या चुकीमुळे विरोधी पक्ष विधानसभेत गदारोळ करत आहेत. अशोक गेहलोत जेव्हा बजेट वाचत होते, तेव्हा त्यांनी मागच्या वर्षीच्या तीन ते चार योजनांचीही माहिती दिली.इतकेच नव्हे तर, यामध्ये मागील वर्षी राबविण्यात आलेल्या नगरविकास योजनांचीही घोषणा त्यांनी केली. त्यानंतर पाणीपुरवठा मंत्री महेश जोशी यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगितले. यानंतर ते सॉरी म्हणाले. मात्र यानंतर विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ सुरू केला.मात्र, मंत्री महेश जोशी यांनी त्यांना मध्येच रोखले. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.मुख्यमंत्री गेहलोत विधानसभेत अर्थसंकल्प वाचत असताना विरोधी पक्षनेत्यांनी गदारोळ सुरू केला. यावेळी अशोक गेहलोत यांनी थोडा धीर धरा असे सांगितले. त्याचवेळी मंत्री महेश जोशी म्हणाले की, तुमच्याकडे सर्वांचे लक्ष आहे. हे चुकीचे आहे.या चुकीमुळे विरोधी पक्ष विधानसभेत गदारोळ करत आहेत. अशोक गेहलोत जेव्हा बजेट वाचत होते, तेव्हा त्यांनी मागच्या वर्षीच्या तीन ते चार योजनांचीही माहिती दिली.इतकेच नव्हे तर, यामध्ये मागील वर्षी राबविण्यात आलेल्या नगरविकास योजनांचीही घोषणा त्यांनी केली. त्यानंतर पाणीपुरवठा मंत्री महेश जोशी यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगितले. यानंतर ते सॉरी म्हणाले. मात्र यानंतर विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ सुरू केला.

विरोधकांच्या गदारोळात विधानसभा अध्यक्षांनी मी सभागृह सोडणार असल्याचे सांगितले. मात्र हा गदारोळ पाहून राजस्थान विधानसभेचे कामकाज 30 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घोषणाबाजी करणार्‍या विरोधी सदस्यांना शांत होऊन अर्थसंकल्प मांडण्याची परवानगी देण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी चुकीबद्दल माफी मागावी, असे कटारिया म्हणाले.बजेटमध्ये चुकून दुसरे पान कसे आले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हा लोकशाहीचा अपमान असल्याचे ते म्हणाले, हे राजस्थानचे दुर्दैव आहे. यापेक्षा दुर्दैव ते काय असू शकते? असे कटारिया म्हणाले.याप्रकरणी ट्विट करताना केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, पेपर लीक झाल्यानंतर आता राजस्थानचे बजेटही लीक झाले आहे. गेहलोतजींनी एक प्रत सोबत ठेवली असती तर त्यांना जुनी प्रत वाचावी लागली नसती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने