पाकिस्तानातील कराची पोलीस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला, 5 जणांचा मृत्यू

कराची पाकिस्तानची अवस्था सध्या फार वाईट आहे. त्याठिकाणची आर्थिक परीस्थिती बिकट असताना आता कराची इथल्या पोलीस मुख्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून 19 जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.दहशतवाद्यांनी काल (शुक्रवारी) पोलीस मुख्यालयावर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरा देण्यासाठी कारवाई सुरू केली. पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं आणि इमारत पुन्हा ताब्यात घेतली. सध्या ही इमारत पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एकूण तीन हल्लेखोर टोयोटा कोरोला कारमधून केपीओमध्ये पोहोचले. एका हल्लेखोराने इमारतीच्या चौथ्या मजल्यावर स्वत:ला उडवले तर इतर दोन दहशतवाद्यांना पोलिसांवर हल्ला चढवला. कराची पोलिसांच्या प्रवक्त्यानेह दहशतवाद्यांना ठार केलं.दहशतवादी पूर्ण तयारीसह आले होते. त्यांच्याकडे शस्त्रसाठा आणि हातगोळे देखील होते. पोलिसांनी संपूर्ण फौज बोलवूनही तीन दहशतवाद्यांनी त्यांना तोडीस तोड उत्तर दिल्याचंही एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. १९ जणांवर सध्या उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने