'Jai Jai Maharashtra Maza' हे गाणं घरात साधं गुणगुणलेही नाहीत शाहिर साबळे..केदार शिंदेनं सांगितलं कारण

मुंबई: शाहीर साबळे यांच्या खड्या आवाजातील 'गर्जा महाराष्ट्र..' या महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा सम्मान जाहीर झाल्या निमित्तानं त्यांचा नातू आणि प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक केदार शिंदेनं गाण्या विषयीच्या काही आठवणी ईसकाळ पॉडकास्ट मुलाखतीत जागवल्या आहेत.त्यावेळी त्यानं आपल्या मनातील आनंद शेअर केलाच आहे, सोबत हे गाणं शाहिर साबळे घरी साधं गुणगुणायचे देखील नाहीत यामागच्या कारणाचा मोठा खुलासा केला आहे.

केदार शिंदेसोबत केलेली ती पॉडकास्ट मुलाखत आपण ऐकाल तर हे कारण नक्कीच जाणून घेता येईल.'गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताला जेव्हा राज्य सरकारनं राज्यगीताचा सम्मान जाहिर केला त्यानंतर शाहीर साबळे यांचा नातू प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माता केदार शिंदेनं एक पोस्टही केली होती. यात त्यानं आजोबांच्या आठवणीत रमताना सरकारचे आभारही मानले होते.सकाळच्या पॉडकास्ट मुलाखतीतही अशा अनेक दुर्मिळ आठवणी केदारनं आजोबा शाहिर साबळे यांच्या सांगितल्या आहेत.अगदी तो २ दिवसांचा असताना त्याच्या आईकडून शाहिर साबळे त्याला आपल्या घरी घेऊन आले इथपासून ते महाराष्ट्रातील लोकधारा कार्यक्रम करताना केलेल्या अनेक दौऱ्यातील आठवणी त्यानं शेअर केल्यात. 






आपल्यालाही या आठवणी शाहिरांच्या त्या भारावलेल्या काळात घेऊन जातील.तेव्हा वर बातमीत जोडलेली केदार शिंदेची पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका.केदार शिंदेनं या मुलाखतीत गंगाधर टिपरे या त्याच्या प्रसिद्ध मालिकेतील आजोबा आणि शिऱ्या या भूमिकांसाठीच्या काही खास गोष्टी या आपल्या आणि शाहिर साबळे यांच्यातील नात्यावरनंच घेतल्या होत्या..त्या नेमक्या कोणत्या यावर देखील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.केदार शिंदेनं याच मुलाखतीत 'गर्जा महाराष्ट्र..' या गाण्याला राज्यगीताचा सम्मान लाभल्यावर जो वादाचा सूर उमटला यावर देखील भाष्य करत वाद उकरून काढणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. तेव्हा नक्की ऐका केदार शिंदेची ही पॉडकास्ट मुलाखत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने