धीरेंद्र शास्त्रींना महाराष्ट्रात बंदी? नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्र लिहिलं आहे. १८ आणि १९ मार्च रोजी धीरेंद्र शास्त्री मुंबईत कार्यक्रम होणार आहे.

धीरेंद्र शास्त्री यांच्या मीरा रोड येथील कार्यक्रमाला परवानगी दिल्यास जनतेची दिशाभूल करून त्यांच्या भावनांशी, श्रद्धेशी खेळ मांडला जाऊ शकतो, अशी भीती पटोले यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी असंही म्हटलंय की, महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचं राज्य आहे. अंधश्रद्धेला आपल्या राज्यात आजिबात थारा नाही. महाराष्ट्रातनं तसा कायदाही केला आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या तसेच संत तुकाराम महाराज यांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शात्रींना महाराष्ट्रात कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणीही पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडं केली आहे.धीरेंद्र महाराजांच्या नागपूरमध्ये आयोजित दिव्य दरबार कार्यक्रमावरुन बराच गदारोळ माजला होता. दिव्यशक्तीचा दावा करणं ही दिशाभूल असून शास्त्रींनी दिव्य चमत्कार करुनच दाखवावा असं थेट आव्हान अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी दिला होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने