You Tube वरून 'भीड' चा ट्रेलर हटवला! काय आहे कारण? चाहत्यांचा संताप

मुंबई:  बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या भीड या चित्रपटाबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र आता हा ट्रेलरच युट्युबवरुन हटविण्यात आल्याचे दिसून आले आहे.लोकांनी प्रश्न विचारण्यास केली सुरुवात....

युट्युबवरुन भीड नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर हटवल्यानंतर नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. असंख्य प्रेक्षकांनी तो ट्रेलर हटविण्याचे कारण विचारले आहे.भीड चित्रपटातून कोविडच्या काळात सर्वसामान्य लोकांचे झालेले हाल, त्यांना ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं याविषयी भाष्य करण्यात आहे. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.एका युझर्सनं लिहिलं आहे की, कुण्या एका पावरफुल व्यक्तीला या चित्रपटाचा खूप राग आला आहे. येणाऱ्या काळात भीडमुळे कोणाला तरी खूप मोठा धोका आहे की काय असे वाटल्यानं अशाप्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळेच त्याचा ट्रेलर सोशल मीडियावरुन हटविण्यात आल्याचे नेटकऱ्यांचे आणि चाहत्यांचे म्हणणे आहे.

भीडचा ट्रेलर व्हायरल होताच त्याला लाखो व्ह्युज मिळाले होते. कोरोनाच्या दरम्यान जो लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता त्यामध्ये कित्येकांना जीवघेण्या समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्याचे चित्रण या चित्रपटाच्या निमित्तानं करण्यात आले आहे.ट्रेलर हटविल्यानंतर चाहत्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र नेमक्या कोणत्या कारणामुळे हा ट्रेलर हटविण्यात आला याविषयी काही सांगण्यात आलेले नाही.भीडचा ट्रेलर हटविण्यात आल्यानंतर अजुनपर्यत मेकर्सकडून कोणत्याही प्रकारचे स्टेटमेंट आलेले नाही.कोरोनाच्या दरम्यान झालेला लॉकडाऊन त्याचे झालेले परिणाम, त्यातून तयार झालेले प्रश्न आणि नोकऱ्यांचा निर्माण झालेला प्रश्न, लाखो लोकांचे झालेले स्थलांतर हे सगळे या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने