अमृता फडणवीसांना लाच आणि ब्लॅकमेलिंग ! उपमुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकरण उलगडून सांगितलं

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसऱ्या आठवड्याचा चौथा दिवस आहे. यावेळी विधानसभेत अमृता फडणवीस यांनी एका डिझायनरविरोधात दाखल केलेल्या तक्रारीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रामध्ये पहिल्याच पानावर एक बातमी आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी म्हणजेच त्यांची धर्मपत्नी अमृता फडणवीस यांच्यासंदर्भात एक बातमी आली आहे. आम्हाला सभागृहाला माहिती हवी आहे की या प्रकरणात सत्यता काय आहे. सर्वांना समजला पाहिजे की, हे नेमकं काय प्रकरण आहे? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला.त्यांच्या या प्रश्नानंतर फडणवीसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

फडणवीस काय म्हणाले?

हा मुद्दा उपस्थित केल्याप्रकरणी मी त्यांचे आभार मानतो. हा विषय उपस्थित केल्यामुळे वस्तुथिती सभगृहास मांडता येईल. माझ्या पत्नीने अशा प्रकारचा एक एफआयआर फाईल केला आहे की, तिच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही काम करुन घेण्याकरीता त्या ठिकाणी प्रयत्न झाला. पहिल्यांदा पैसे ऑफर करण्यात आले. त्यानंतर ब्लॅकमेल करण्यात आले.याची वस्तुस्थिती अशी आहे की, अनिल जयसिंघानी या नावाचा व्यक्ती कदाचित ७-८ वर्ष फरार आहे. त्याच्यावर १४ -१५ गुन्हा दाखल आहेत. त्यांची मुलगी आहे. ती शिकलेली आहे. कधीतरी १५-१६ च्या दरम्यान अमृताला भेटत होती. नंतर तिचं येण बंद झालं आणि अचानक २०२१ साली ती मुलगी पुन्हा भेटली.त्यावेळी ती, मी डिझायनर आहे. ज्वेलरी तयारी करते आणि मी बेस्ट पॉवरफुल वुमेन्समध्ये माझ नावं आलं आहे. त्यानंतर माझी आई वारली आहे. मी तिच्यावर पुस्तक लिहलं आहे. तुम्ही त्याचं प्रकाशन करा. असं सांगत तिनं विश्वास संपादन केला. त्यानंतर येण जाण सुरु केलं.त्यानंतर डिझाईन क्लोथ वापरा अस सांगितलं. माझी पत्नी सोशल लाईफ असल्यामुळे तिने तिचं क्लोथ युज केलं. त्यातून विश्वास संपादीत झाला. त्यानंतर तिनं माझ्या वडिलांना काही चुकीच्या केसेसमध्ये फसवण्यात आलं आहे आणि तुम्ही त्यांना सोडवा.माझ्या पत्नीनं तिला सांगितल तुझ जे काही निवेदन आहे ते फडणवीसांना देऊन टाक. सरकार बदलल्यानंतर त्या मुलीने माझ्या वडिलांना फसवण्यात आल आहे. तुम्ही मदत करा. काही दिवसांनी बोलणं सुरु केलं की, माझे वडिल सगळ्या बुकिजना ओळखतात.मागील काळात आम्ही काही बुकिजची माहिती देत होतो आणि मग तिथं रेड होत होती. त्यावेळी आम्हाला दोन्हीकडून पैसे मिळत. तुम्ही जर थोडी मदत केली तर आपणही अशा रेड कंडक्ट करु.

तेव्हा माझ्या पत्नीने गंभीर दखल न घेता असल्या फालतू गोष्टी आम्ही करत नाही. अस उत्तर दिलं. त्यानंतर एक दिवस पुन्हा तिनं सांगितलं. अशा प्रकारे काम केलं तर आपल्याला फायदा होईल. मला मदत करा नाहीतर मी तुम्हाला १ कोटी रुपये देते तुम्ही माझ्या वडिलांना सोडवा.माझ्या पत्नीने स्पष्ट सांगितलं ते चुकिचं फसले असतील. पोलिसांकडून त्यांना सोडवण्यात येईल. त्यानंतर वारंवार बुकिजचा विषय निघत गेला. त्यानंतर माझ्या पत्नीने तिला ब्लॉक केले. त्यानंतर अज्ञात नंबर वरुन व्हिडीओ, ऑडिओ, मेसेज येऊ लागले.या व्हिडीओमध्ये अत्यंत गंभीर व्हिडीओ दिसला. त्यामध्ये ती बॅगेत पैसे भरते आणि ती बॅग आमच्या घरी काम करणाऱ्या बाईला देते आणि त्यासोबत धमकी देखील दिली.

हे व्हिडीओ टाकले तर तुमच्या नवऱ्याची नोकरी जाईल. माझे सर्व पक्षाशी संबंध आहे. तुम्ही ताक्ताळ आम्हाला मदत करा. हे माझ्या पत्नीने मला सांगितलं. मी लगेच पोलिसांना बोलावलं. पण एफआयआर पब्लिक नाही केला.पोलिसांनी सांगितलं होत. पोलिसांनी फॉरेनेसिंक रिपोर्ट करण्यात आलं. त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आल्या. त्यानंतर त्यांनी कबूल केलं. त्यावेळी त्यांनी काही पोलिसांसह राजकीय नेत्यांची नाव घेतली.मागच्या सिपींच्या काळात आमच्या केसेस परत घेण्याची कारवाई सुरु होती. तुम्ही आल्यावर थांबली. आता जर तुम्ही आमच्या केसेस वापस नाही केल्यातर आम्ही उलटं सांगयला सुरुवात करु. यातील काही गोष्टी रेकॉर्ड करण्यात आलं आहे.पण पोलिसांकडे सर्व गोष्टी नोंदवण्यात आलं आहे. आता एफआयआर दाखल करण्या आला आहे. त्या मुलीने ज्या प्रकारच्या हिंट देण्यात आल्या आहेत. त्यातून असं लक्षात येत की मला आणि माझ्या कुटूंबाला अडकवण्याचा प्रयत्न केला. पण ईश्वरकृपा.त्या मुलीचे अनेक मोठ्या नेत्यांशी संबध आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने