सलमान खान वडिलांपेक्षा अधिक 'या' व्यक्तीला मान द्यायचा.. कोण होता गणेश?सलीम खाननी केला खुलासा

मुंबई:   कपिल शर्मा आणि त्याचा कॉमेडी शो नेहमीच चर्चेचा भाग राहिला आहे. शो मध्ये येणारे सेलिब्रिटी कपिल सोबत खूपसारी मजा मस्ती करताना दिसतात. काही सेलिब्रिटी तर एकमेकांचे सीक्रेट्सही ओपन करतात. काहीसं असं सलीम खाननी देखील सलमानच्या बाबतीत केलं होतं.सलीम खान जेव्हा २०१९ मध्ये 'द कपिल शर्मा शो' मध्ये गेले होते ते्हा त्यांनी सलमान खान,अरबाज खान आणि सोहेल खान यांचे अनेक सीक्रेट्स ओपन केले आहेत.कपिलपासून सगळ्यांचीच तेव्हा हसून हसून पुरती वाट लागली होती. तर तिथे उपस्थित असलेल्या सलमान,अरबाज आणि सोहेलची अवस्था सीक्रेट्स ओपन होताना पाहून तोंड कुठे लपवावं आता अशी झाली होती.सलिम खान एकामागे एक अशी आपल्या तिन्ही मुलांची पोल खोल करत होते. आणि सलमान खान त्यांना एकटक हैराण होऊन पाहत होता. कितीतरी वेळा त्याला आपलं हसू दाबणं कठीण झालंय हे स्पष्ट कळत होतं.सलीम खाननी एक सीक्रेट तर असं सांगितलं की ते ऐकून सगळ्यांचेच होश उडाले. सलीम खान काही दिवसांपूर्वीच अरबाज खानच्या शो मध्ये आले होते आणि तेव्हा त्यांनी आपल्या आयुष्यातीलही अनेक सीक्रेट्स ओपन केले होते.कपिल शर्माच्या शो मध्ये सलीम खान यांनी आपल्या मुलांचा खोडकरपणा आणि करतुती सांगत म्हटलं होतं की, ''आमच्या घरी एक माणूस यायचा. मी कामात खूप व्यस्त होतो त्यामुळे संध्याकाळी उशिरा घरी पोहोचलो. तेव्हा घरात नुसतं गणेश-गणेश चालू होतं. गणेश आला आहे. गणेशला चहा द्या. खुर्ची द्या बसायला. मी विचारलं,हा गणेश कोण आहे? ज्याचा मानपान माझ्यापेक्षा जास्त केला जातोय या घरात''.

सलीम खान पुढे म्हणाले की,''मी घरी आलो तेव्हा मला कुणी नाही विचारलं की पाणी हवं का,चहा देऊ का? फक्त सुरु होतं..अरे पाणी आणा..चहा आणा गणेशसाठी. तेव्हा मी विचार केला की आता माहिती काढायलाच हवी या गणेश संदर्भात''.''ज्याला माझ्या घरात माझ्यापेक्षा जास्त मान मिळतोय. कोण आहे हा माणूस? तेव्हा नंतर कळालं की परिक्षेचे पेपर जेव्हा लीक व्हायचे तेव्हा तो माणूस सलमान,अरबाज,सोहेलला पेपर आणून द्यायचा''.सलीम खान जेव्हा ही गोष्ट सांगत होते तेव्हा सलमान खान,सोहेल खान,अरबाज खान यांची हसून हसून वाट लागली.दबंग खानच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर तो सध्या आपला सिनेमा 'किसी का भाई,किसी की जान' या सिनेमामुळे चर्चेत आहे. जो २१ एप्रिलला रिलीज होतोय. या सिनेमात पूजा हेगडे,पलक तिवारी,शहनाज गिल,राघव जुयाल,भाग्यश्री,असिफ शेख,सिद्धार्थ निगम,अभिमन्यु सिंग आणि अमृता पुरी असे अनेक कलाकार दिसणार आहे.'किसी का भाई, किसी का जान' मधील एका गाण्यात रामचरण आणि यो यो हनी सिंग यांचा कॅमियो देखील आहे. सलमानचा 'टायगर ३' देखील रिलीजच्या वाटेवर असून १० नोव्हेंबरला तो आपल्या भेटीस येत आहे.नुकताच सलमान 'पठाण' मध्ये कॅमियो साकारताना आपल्याला दिसला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने