'साताऱ्याचा कंदी पेढा' कसब्यात पडला 'फिका', मिळाली अवघी...

पुणे: संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणारी कसबा पोटनिवडणूकीचा निकाल आज लागला आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना मतदारांनी प्रचंड मताधिक्यानं निवडून दिले आहे. भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे.या निवडणूकीमध्ये लक्षवेधी लढत होती ती महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने अशी होती. त्यामध्ये आणखी एका उमेदवारानं निवडणूकीतील चुरस वाढविण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रेटी अभिजित बिचुकले याच्या नावाचा समावेश होता. त्यांनी फॉर्म भरुन आपण निवडून येणार असे सांगितले होते.निवडणूकीचा निकाल लागला असून त्यामध्ये धंगेकर यांनी बाजी मारली आहे. त्यांना ७२ हजार ५९९ मतं मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी ६१ हजार १४० मतं मिळाली आहेत. तर बिचुकलेला अवघी चार मतं मिळाली आहे. दोन आकडी मतं मिळवण्यात देखील त्याला अपयश आल्याचे दिसून आले आहे. निकालानंतर सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. त्यात बिचुकलेला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.बिचुकले हा सोशल मीडियावर त्याच्या परखड वक्तव्यासाठी ओळखला जातो. कसब्यातील निवडणूकीतमध्ये आपल्याला चांगली मतं मिळतील, असा विश्वास बिचुकलेनं व्यक्त केला होता. प्रत्यक्षात त्याच्या पारड्यात फार कमी मतं आली आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेले मीम्सनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने